6 C
New York
Tuesday, April 1, 2025

Buy now

spot_img
spot_img

” अण्णा पर्व उत्सव ” भव्य जंगी कुस्ती कार्यक्रमाला रेकॉर्ड ब्रेक गर्दी!

” अण्णा पर्व उत्सव ” आयोजित महादेवाला अभिषेक, भव्य जंगी कुस्ती, वृक्षारोपण, शालेय साहित्य वाटप करून कार्यक्रम उत्साहात संपन्न

★महादेवानंद शास्त्री व विठ्ठल महाराज यांनी भाऊसाहेब भवर यांना जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दिल्या शुभेच्छा!

★आ.सुरेश आण्णांचा वाढदिवस जनतेच्या हिताचा, जनतेच्या हक्काचा!

पाटोदा | सचिन पवार

महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार सुरेश आण्णा धस यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या वर्षापासून अण्णा पर्व उत्सव कार्यक्रम मुगाव येथे मोठ्या उत्साहात साजरा होत आहे दोन दिवस विविध उपक्रमाने अण्णांचा वाढदिवस साजरा केला जात आहे यावर्षी देखील भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब अण्णा भवर यांनी अण्णा पर्व उत्सव च्या माध्यमातून महादेवाला अभिषेक, शालेय साहित्य वाटप, वृक्षरोपण तसेच 2 फेब्रुवारी रोजी भव्य जंगी कुस्त्यांची मैदान आयोजित करण्यात आले होते यामध्ये जवळपास 22 लाखांच्या कुस्त्याचं आयोजन केले होते यावेळी आलेल्या सर्व नागरिकांना भोजनाची व्यवस्था देखील दिवसभर करण्यात आली होती.
अण्णा पर्व उत्सव मुगाव 2024 आयोजित महादेवाला अभिषेक, वृक्षारोपण, शालेय साहित्य वाटप व भव्य जंगी कुस्त्यांचे आयोजन यावर्षी करण्यात आले होते यावेळी अंमळनेर सर्कलमधील नागरिकांनी एकच गर्दी केली होती या कार्यक्रमासाठी आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे युवा नेते जयदत्त भैय्या धस, जिल्हा परिषद सदस्य देविदास आबा धस यांची विशेष उपस्थिती राहिली तर या कार्यक्रमाचे उद्घाटन महादेवानंद शास्त्री महाराज व विठ्ठल महाराज यांच्या हस्ते करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. या कार्यक्रमासाठी अमळनेर सर्कल मधील सर्व आजी माजी सरपंच सदस्य ग्रामसेवक राजकीय कार्यकर्ते धार्मिक क्षेत्रातील मान्यवर सामाजिक सांस्कृतिक शिक्षण क्षेत्रातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती तसेच कुस्ती पाहण्यासाठी तालुक्यातील बाहेर तालुक्यातील जिल्ह्यातील बाहेर जिल्ह्यातील अनेक मान्यवर देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित होते अण्णा पर्व उत्सव कार्यक्रमाचे आयोजक भाऊसाहेब अण्णा भवर यांचे आलेल्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये जाहीर सत्कार करण्यात आला, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश ठोसर यांनी केले तर आभार प्रदर्शन देविदास खोटे यांनी केले.

★महिला कुस्तीपटूंची विशेष उपस्थिती

अण्णा पर्व उत्सव मुगगाव 2024 मध्ये मोठ्या संख्येने महिला कुस्तीपटूंची विशेष उपस्थिती पाहायला मिळाली. या महिला कुस्तीपटूंच्या कुस्ती लावण्यासाठी मैदानामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य देविदास आबा धस यांनी उपस्थित राहून स्वतः कुस्त्या लावत महिलांना प्रोत्साहन दिले.

★दिवसभर अन्नदान!

भव्य जंगी कुस्त्याचे मैदान मुगगाव येथे येणाऱ्या सर्व प्रेक्षकांसाठी खेळाडूंसाठी अन्नदानाचा आयोजन करण्यात आले होते. सुरेश आण्णा धस यांच्या वाढदिवसानिमित्त मुगगाव येथे आयोजित भव्य जंगी कुस्त्यांचे मैदान, वृक्षारोपण, शालेय साहित्य वाटप, महादेवाला अभिषेक अशी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी आलेल्या नागरिकांसाठी दिवसभर जेवणाचे आयोजन करण्यात आले होते.

★अंमळनेर सर्कल व पाटोद्यातील अनेक नेते मंडळींची विशेष उपस्थिती

आमदार सुरेश आण्णा धस यांच्या वाढदिवसानिमित्त मुगाव येथे अण्णा पर्व उत्सव आयोजित मध्ये घेण्यात आलेल्या उपक्रमांमध्ये अमळनेर सर्कल बरोबर पाटोदा तालुक्यातील अनेक विशेष नेते मंडळींची विशेष उपस्थिती पाहायला मिळाली. एकूणच पाहिलं तर संपूर्ण पाटोदा व आष्टी मतदार संघ मुगगाव मध्ये आलाय की काय असेच दृश्य पाहायला मिळत होते.

★भाऊसाहेब आण्णांच नागरिकांकडून विशेष कौतुक!

मुगाव येथे भव्य जंगी कुस्तीचे मैदान तसेच विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले होते या कार्यक्रमासाठी परिसरातील अंमळनेर सर्कल मधील पाटोदा तालुक्यातील आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघातील अनेक नागरिकांची उपस्थिती पाहायला मिळाली आलेल्या सर्व नागरिकांकडून भाऊसाहेब आण्णा भवर यांचे कौतुक केलं जात होते.

★महादेवानंद शास्त्री व ह भ प विठ्ठल महाराज यांचे शुभ संकेत!

भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब अण्णा भवर यांनी आयोजित केलेल्या अण्णा पर्व उत्सव कार्यक्रमांमध्ये अश्वलिंग देवस्थानचे महादेवानंद शास्त्री महाराज तसेच श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे महंत विठ्ठल महाराज यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी दोघांनीही मनोगत व्यक्त करताना भाऊसाहेब भवर यांना जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शुभेच्छा देऊन तयारीला लागण्याचा संदेश दिला. यावेळी उपस्थित नागरिकांनी एकच जल्लोष केला होता.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!