★मुगगावच्या भव्य कुस्ती दंगलसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहा – भाऊसाहेब भवर
पाटोदा | सचिन पवार
महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री लोकनेते सुरेश आण्णा धस यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या वर्षापासून अण्णा पर्व उत्सव मुगाव येथे मोठ्या उत्साहात साजरा होत आहे या वर्षी देखील मोठ्या उत्साहात साजरा होत असून 22 लाखांच्या कुस्त्यांची दंगल पाहायला मिळणार आहे तरी परिसरातील अंमळनेर मधील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान भाजपा ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भवर यांनी केले आहे.
मुगाव येथे अण्णा पर्व उत्सव मुगाव आयोजित भव्य जंगी कुस्त्यांची मैदान मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रजी मस्के साहेब तर उद्घाटक म्हणून रमेश रावजी आडसकर साहेब हे येणार आहेत तर परिसरातील अमळनेर सर्कलमधील नागरिकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे आव्हान भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब अण्णा भवर यांनी केले आहे.
★22 लाखांच्यावर कुस्त्या पाहायला मिळणार!
अण्णा पर्व उत्सव मुगगाव आयोजित भव्य जंगी कुस्त्यांचे मैदान मुगाव येथे 2 फेब्रुवारी रोजी लोकनेते सुरेश आण्णा धस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केले असून यामध्ये जवळपास 22 लाख रुपयांच्या कुस्त्या खेळल्या जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
★काही ठराविक कुस्त्या आणि कुस्त्यांचा आकडा!
पहिली कुस्ती 5 लाख 51 हजार, दुसरी कुस्ती 2 लाख 51 हजार, तिसरी कुस्ती 1 लाख 51 हजार, चौथी कुस्ती 61 हजार, पाचवी कुस्ती 51 हजार, सहावी कुस्ती 35 हजार अशा पद्धतीने हजारो रुपयाच्या कुस्त्या जवळपास 22 लाखांच्या होणार आहेत.