6 C
New York
Tuesday, April 1, 2025

Buy now

spot_img
spot_img

महागणार! ३ जुलैपासून स्कूटर-मोटरसायकलच्या किंमती वाढणार; Hero ने केली घोषणा

गातील सर्वात मोठी दुचाकी निर्माता कंपनी हीरो मोटोकॉर्पने मोठा झटका दिला आहे. या कंपनीच्या स्कूटर, मोटरसायकल खरेदी करणे आता महागणार आहे. ३ जुलैपासून हीरोच्या दुचाकींच्या किंमती १.५ टक्क्यांनी वाढणार आहेत.

कंपनी आपल्या पोर्टपोलिओतील दुचाकींच्या किंमती अपडेट करणार आहे.

ही दरवाढ वेगवेगळ्या मॉडेल आणि व्हेरिअंटवर अवलंबून असणार आहे. ही दरवाढ वेळोवेळी कंपनीद्वारे केल्या जाणाऱ्या दरवाढीच्या समिक्षेतून केली जात आहे. यामध्ये चलन, खर्च या सारख्या गोष्टी विचारात घेण्यात आल्या आहेत. ही एक व्यावसायीक गरज असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

ग्राहकांच्या खिशावर होणारा परिणाम कमी करण्यासाठी Hero MotoCorp नाविन्यपूर्ण वित्तपुरवठा कार्यक्रम सुरू ठेवेल, ज्यामुळे लोकांना दुचाकी खरेदी करणे सोयीचे होईल. देशाच्या बहुतांश भागात मान्सूनची सुरुवात आणि अर्थ सुधारणेसह. प्रणालीमध्ये, आगामी सणासुदीच्या हंगामात उद्योगाचे प्रमाण वाढण्याची अपेक्षा आहे, असे कंपनीने पुढे म्हटले आहे.

Hero MotoCorp ने अलीकडेच भारतात अपडेट केलेले Xtreme 160R लॉन्च केले. ही बाईक 1.27 लाख रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) च्या प्रारंभिक किंमतीत लॉन्च करण्यात आली आहे. याच्यासह स्पेंडर सारख्या दुचाकींची किंमतही वाढणार आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!