महाराष्ट्रात सर्वात प्रथम कुसळंबच्या पवारांनी संघर्ष योद्धा मनोज जरांगे ना कोरले छातीवर!
★कुसळंबाचा युवक बाळू पवार ने स्वतःच्या छातीवर कोरले जरांगे पाटील
★मराठ्यांसाठी आरक्षण किती महत्त्वाचे हे दाखवण्याचा बाळू पवार चा प्रयत्न!
पाटोदा | सचिन पवार
पाटोदा तालुक्यातील कुसळंब गाव मराठा आरक्षणासाठी नेहमीच आपली वेगळी ओळख दाखवत आले आहे. उपोषण असेल किंवा आंदोलन करून पाठिंबा दर्शवणे असेल किंवा गाव बंद करून आंतरवाली येथे साठ गाड्यांचा ताफा घेऊन गावाने आदर्श दाखवून दिला होता. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर कुसळंब गाव नेहमीच अग्रस्थानी राहिले आहे. महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली काढल्याने मराठा समाजामध्ये अति आनंदाचे वातावरण पाहायला मिळालं मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या संघर्षाला यश मिळाले असून त्यांच्या संघर्षातून मराठा समाजाला चांगले दिवस येणार आहेत आता प्रत्येक मराठा बांधव मनोज जरांगे यांना आपल्या हृदयात करून ठेवू लागला आहे. कुसळंब येथील बाळू पवार या युवकाने महाराष्ट्रात सर्वात प्रथम स्वतःच्या छातीवर संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांचे छायाचित्र कोरले असून मराठा आरक्षणाचे महत्त्व किती होतं हे मराठा युवक बाळू महादेव पवार यांनी दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे.
कुसळंब येथील मराठा युवक बाळू महादेव पवार यांनी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे छायाचित्र स्वतःच्या छातीवरती कोरले मराठा आरक्षणाचा महत्त्व सर्वसामान्य मराठा बांधवांना किती आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर कुसळम येथील नागरिकांनी नेहमीच वेगळेपण दाखवून दिले आहे, त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रथम संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांचे छायाचित्र टॅटूच्या माध्यमातून स्वतःच्या छातीवर कोरत मराठा आरक्षणाचे महत्त्व दाखवून देत कुसळंबकरांचे वेगळेपण बाळू महादेव पवार यांनी दाखवून दिले आहेत.
★मराठ्यांच्या भविष्याचा सूर्य उगवला!
अनेक वर्षापासून मराठा समाज आरक्षणामुळे कितपत पडला होता आणि युवकांना गुणवत्ता सिद्ध करण्याची सुद्धा संधी मिळाली नाही ज्यांना मिळाली त्यांना आरक्षणामुळे आपल्या बुद्धीला चालना देता आली नाही तर बुद्धी असून देखील आरक्षणामुळे त्याचा उपयोग करता आला नाही परंतु संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांच्या संघर्षामुळे सबंध मराठा समाजामध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे आणि आरक्षण मिळाल्याने प्रत्येक गरजूवंत मराठ्यांच्या घरामध्ये क्रांतीचा सूर्य उगवला आहे, त्यामुळे मी सुद्धा माझ्या छातीवर संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांचे छायाचित्र कोरले असून आरक्षणाचे महत्त्व किती आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे.
– बाळू महादेव पवार
मराठा युवक कुसळंब.