मराठ्यांचा क्रांतीसुर्य मनोज जरांगे पाटलांच्या संघर्षाला यश मिळालं!
★मराठा बांधवांना सक्रिय व्हा ; एकमेकांना सहकार्य करा प्रमाणपत्र काढून घ्या!
बीड | सचिन पवार
मराठ्यांचा क्रांतीसुर्य मनोज जरांगे पाटलांच्या संघर्षाला यश मिळाला आहे. सर्वसामान्य गरजवंत मराठ्यांच्या लढ्यातून मिळालेलं आरक्षणाचा गोड फळ चाखण्यासाठी एकमेकांना मदत करा सहकार्य करा ज्या ठिकाणी अडचणी त्या ठिकाणी आम्हाला फोन करा परंतु एकही मराठा बांधव आरक्षणापासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्या असे आव्हान मराठासेवक किशोर पिंगळे यांनी केले आहे.
अनेक वर्षाच्या लढ्यातून सकल मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळाला आहे. यात हक्काच्या आरक्षणापासून एकही मराठा बांधव वंचित राहणार नाही याची सर्वस्वी जबाबदारी प्रत्येक मराठा बांधवावर आहे. ज्या मराठा बांधवांना प्रमाणपत्र काढण्यासाठी अडचण येईल त्या ठिकाणी कोणत्याही मराठा बांधवांनी उभा राहायचं आणि त्यांना सहकार्य करायचा आहे. प्रमाणपत्र काढून देण्यासाठी सहकार्य करता येईल ते करत चला आणि ज्या ठिकाणी अडचणी त्या ठिकाणी आम्हाला फोन करून कळवत चला जेणेकरून एकही मराठा बांधव आरक्षणाच्या हक्कापासून वंचित राहणार नाही. हा आपला हक्क अनेक समाज दोशींनी झाकून ठेवला होता त्यांच्या बुडाखालून मराठ्यांनी आपल्या हक्काचे आरक्षण खेचून आणला आहे. आता आपली जबाबदारी आहे. आपला एकही मराठा बांधव आरक्षणापासून वंचित राहणार नाही, प्रत्येकांना प्रमाणपत्र काढून देण्यासाठी प्रयत्न करेल एवढीच अपेक्षा आहे, ज्या ठिकाणी अडचणी त्या ठिकाणी आम्हाला संपर्क करा असे आव्हान मराठा सेवा किशोर पिंगळे यांनी केले आहे.
★मनोज जरांगे यांची सावली किशोर पिंगळे पुन्हा सक्रिय!
आरक्षणाच्या लढ्यामध्ये संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत सावलीप्रमाणे राहुन आपली भूमिका खंबीरपणे पार पाडली असे मराठा सेवक किशोर पिंगळे यांनी पुन्हा एकदा सर्वसामान्य मराठा बांधवांसाठी सक्रिय होऊन प्रमाणपत्र काढण्यासाठी काही अडचण आल्यास आम्हाला संपर्क करा असे आव्हान करत मराठा बांधवांमध्ये जागृती निर्माण करत संपर्कात राहण्याचे आवाहन केले आहे तसेच कोणताही मराठा बांधव आरक्षणापासून वंचित राहणार नाही याची सर्व मराठा बांधवांनी खबरदारी घ्यावी अशी ही विनंती केली आहे.