6 C
New York
Tuesday, April 1, 2025

Buy now

spot_img
spot_img

हळदी-कुंकू कार्यक्रमातून महिला सक्षमीकरणाचा नारा

★चिंचोलीच्या कर्तव्यदक्ष सरपंच सौ रोहिणी मारुती सांगळे यांचा स्तुत्य उपक्रम!

पाटोदा | प्रतिनिधी

सखी मंच महिला मंडळ व कर्तव्यदक्ष सरपंच सौ रोहिणी मारुती सांगळे यांच्या तर्फे चिंचोली गहीनीनाथ गड येथे तीळ-गुळ व हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले…
यानिमित्त पारंपारिक सणाला आधुनिकतेची जोड देत महिला सक्षमीकरण, स्वसंरक्षण यावर जनजागृती करण्यात आली.या कार्यक्रमात गावातील सर्व महिलांनी उस्फुर्त प्रतिसाद देत सहभाग घेतला. महिलांची ओटी भरून त्यांना वाण देण्यात आले. त्याचबरोबर ग्रामीण भागातील शेतकरी व शेतमजूर महिलांचे जीवन कायम शेतीकामात व्यस्त असते.अशा कार्यक्रमातूनच ग्रामीण भागातील महिलांच्या भेटींगाठी होत असतात. असा कार्यक्रम म्हणजे त्यांच्यासाठी पर्वंनीच म्हणावा लागेल. हळदी कुंकू समारंभा बरोबरच उखाणे स्पर्धा, व इतर मनोरंजनाचे खेळ यानिमित्ताने घेण्यात आले. वयोवृद्ध महिलांनीही या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावली होती. या समारंभामुळे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आपल्या संस्कृतीचा वारसा जतन करून एकमेकींच्या विचारांची देवाणघेवाण होते, ताणतनाव कमी होऊन मुक्तपणे मनसोक्त गप्पा मारतात.यासाठी अशा कार्यक्रमाची खरोखरचं अत्यंत गरज आहे. पहिल्यांदाच अशा सार्वजनिक कार्यक्रमाला गावातील महिलांनी अतिशय उस्फुर्तपणे प्रतिसाद दिला. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वच महिला भगिनींनी परिश्रम घेतले.

★चिंचोली ग्रामपंचायत कार्यालयाकडून महिला सक्षमीकरणाचा नारा

अठ्ठेगाव पुठ्यातील चिंचोली (गहिनीनाथ गड) च्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये नवनिर्वाचित सरपंच सौ रोहिणी मारुती सांगळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर महिला सक्षमीकरणावर भर देत विविध उपक्रम घेण्याचा संकल्प केला आहे संक्रांतीनिमित्त हळदीकुंकू कार्यक्रमातून महिला सक्षमी करण्यासाठी विविध उपक्रम घेऊन सामाजिक संदेश देत महिला सक्षमीकरणासाठी पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!