16.9 C
New York
Saturday, April 5, 2025

Buy now

spot_img
spot_img

गरजवंत मराठ्यांच्या घरामध्ये आरक्षणाच्या क्रांतीचा सूर्य उगवला!

मराठ्यांच्या मनोज पाटलानी छगन भुजबळांचा खोटा उपटला!

★मराठ्यांच्या घराघरात कडाक्याच्या हिवाळ्यात देखील दिवाळी!

★मराठ्यांचा लढा यशस्वी!

बीड | सचिन पवार

मराठ्यांचा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला यश मिळाले आहे अंतरवाली सराटी ते मुंबई आझाद मैदान पर्यंत पायी दिंडीच्या माध्यमातून सरकारला जाग करण्यासाठी सुरू केलेल्या यात्रेला मुंबईतील वाशी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थांबवत त्यांना ज्यूस पाजून उपोषण सोडले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उपोषण सोडल्यानंतर मनोज जरांगे यांनी उपस्थित मराठा समाजाला संबोधित केले. समाजाच्या प्रमुख मागणीवर सरकारने योग्य पर्याय काढत मराठा समाजाची सर्व प्रश्न सोडवल्याचं राजपत्र एकनाथ शिंदे यांनी जरांगेकडे सुपूर्द केले. कुणबी नोंदीच्या आधारे सगळ्या सोयऱ्यांना जात प्रमाणपत्र देण्यासंदर्भातील राजपत्र एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे कडे दिले यावेळी एकनाथ शिंदे यांच्याकडे विविध मागण्या केल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाने उधळलेल्या गुलालाचा अपमान होऊ देऊ नये असे जरांगे म्हणाले. न्या. शिंदे समितीला देखील मुदतवाढ द्यावी हैदराबादचे 1884 चे गॅझेट लागू करावे, अशी मागणी जरांगे यांनी केली.
मनोज जरांगे पाटील यांच्या संघर्षाच्या आणि मराठा समाजाच्या एकीच्या जोरावर मराठा समाजाला आरक्षण मिळाले आहे. मराठा समाजाची सुनामी मुंबई पोहोचण्या अगोदरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुणबी नोंदीच्या आधारे सग्या सोयऱ्यांना जात प्रमाणपत्र देण्यासंदर्भातील राजपत्र मनोज जरांगे यांच्याकडे सुपूर्द केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुणबी नोंदीचा आधारे महाराष्ट्र सरकारने काढलेल्या राजपत्राची प्रत जरांगे कडे देतात आलेल्या कोट्यावधी मराठ्यांच्या आनंदात साखरच पडली म्हणावी लागेल या पद्धतीने जमलेल्या कोटी मराठ्यांनी एकच जल्लोष केला आणि आरक्षणाच्या घोषणेनंतर गुलालाची उधळण करत मराठ्यांना आजपर्यंत आलेल्या कठीण प्रसंगातून मुक्त झाल्याच्या भावना देखील व्यक्त होत होत्या. मराठा आरक्षणाचा तिढा आता सुटल्याने सकल मराठा समाजामध्ये आनंद व्यक्त करत गुलालाची उधळण करत कडाक्याच्या थंडीत देखील दिवाळी साजरी होताना दिसत आहे. येणाऱ्या काळात मराठा योद्धा मनोज जरांगे यांचे फोटो प्रत्येक मराठ्यांच्या घरात पाहायला मिळतील यातही तीळ मात्र शंका उरलेली नाही.

★आंदोलनात मृत्यू पावले यांच्या कुटुंबीयांना नोकऱ्या देणार

जे लोक आंदोलनात मृत्यू मुखी पडले त्यांच्या कुटुंबीयांना आपण वाऱ्यावर सोडणार नाही त्यांना आपण नोकरी देणार आहोत अशी घोषणाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. आपण कर्तव्य म्हणून त्या ऐंशी लोकांना दहा लाख रुपयाप्रमाणे मदत केली नोकरी देणार आहोत असे जाहीर केले.

★मराठ्यांच्या लढ्याला ऐतिहासिक यश!

गेल्या अनेक महिन्यापासून मराठा आरक्षणाचा घोंगडं भिजत पडलं होतं सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी पुनर्विचार याचिका दाखल असताना राज्य पातळीवरही टिकणार आरक्षण देण्याकरिता सरकार प्रयत्न करत होतो अखेर म्हणून जरांगे पाटलांच्या लढ्यालाही मोठे मिळाला आहे मध्यरात्री तब्बल तीन तास चर्चा झाल्यानंतर सरकारने मनोज जरांगेच्या सर्व मागण्याची सुधारित अध्यादेश जारी करून त्यांच्या मागण्या मान्य केले आहेत. या संदर्भात म्हणून जरांगे पाटलांनी मध्यरात्री पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली दरम्यान बीड जिल्ह्यातील मराठवाड्यातील लाखो मावळ्यांच्या एकजुटीचा आणि मराठा युद्ध म्हणून जरांगे यांच्या लढ्याचा हाफ ऐतिहासिक विजय असून अनेक संकटावर मात करून जरांगे पाटलांनी मावळ्यांना सोबत घेऊन मराठा आरक्षण मिळवलंच एकट्याने सरकारला हादरून सोडले हक्काचा आरक्षण पदरात पाडून घेतले त्यामुळे ठीक ठिकाणी एकटा बॉस असे बॅनर झळकत आहेत.

★सगळ्या सोयऱ्यांना जात प्रमाणपत्र मिळणार

ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत अशा सगळ्या सोयऱ्यांना जात प्रमाणपत्र देण्याची मागणी म्हणून जरांगे पाटलांनी लावून धरली होती ही मागणी ही मान्य करण्यात आली असून याबाबत अधिकृत शासन निर्णय जाहीर झाला असल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितलं मराठा समाजाच्या 54 लाख नोंदी सापडले आहेत सापडलेल्या नोंदीचे प्रमाणपत्र तातडीने देण्यात यावे तसेच त्यांच्या कुटुंबातील नागरिकांना ताबडतोब प्रमाणपत्र देण्यात यावेत असा आपला लढा होता ही प्रक्रिया सुरू झाली आहे याबाबतीचा डाटा सरकार थोड्याच दिवसात देणार आहेत असं जरांगे पाटील म्हणाले..

★आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला ओबीसीचे अधिकार मिळतील : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला ओबीसीचे अधिकार आणि ओबीसी च्या सर्व सवलती घेतलेल्या जातील अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली तसेच ते म्हणाले एक मराठा लाख मराठा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही मराठ्यांनी संयमी पण आहे या ठिकाणी आंदोलन केलं राज्य सरकारने तुमच्या सर्व मागणी मान्य केले आहेत मराठा समाजासाठी असलेल्या सर्व महामंडळांना न्याय देण्याचं काम राज्य सरकार करेल हे सरकार मराठा समाजाच्या सर्व मागण्या पूर्ण करेल हा शब्द मी या ठिकाणी देतो तसेच मनोज जरांगे यांचे अभिनंदन करतो..

★आंदोलन संपलं नाही स्थगित करतोय अखेर पाटलांनी सरकारला खोटी मारलीच!

मराठा आरक्षणावर सकारात्मक चर्चा झाल्यानंतर आणि सरकारने काढलेल्या महत्त्वाच्या जीआर नंतर मनोज जरांगे यांनी आपलं आंदोलन संपवले असल्याची माहिती समोर येत होती दरम्यान असे असतानाच म्हणून एक मोठ वक्तव्य करत पुन्हा सरकारची चिंता वाढवली आहे मराठा आंदोलन संपवत नसून त्याला स्थगिती देत असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या निर्णयानंतर जरांगेंनी सरकारला खोटी मारल्याची चर्चा होत आहे. रात्री झालेल्या शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर आज सकाळी पहिली प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे म्हणाले की आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी माझ्या समाजाने खूप संघर्ष केला आरक्षण मिळत कसं नाही यासाठी शेवटी आम्हाला मुंबईत यावं लागलं मराठी एवढ्या ताकदीने मुंबईत आले की या ताकतीमुळेच आज आदेश निघाला आहे अन्यथा हा आदेश निघाला नसता मराठी चारही बाजूंनी मुंबईत घुसू लागले आणि सरकारला हा निर्णय घ्यावा लागला मात्र आंदोलन संपले नसून आंदोलन सध्या स्थगित करण्यात येत असल्याचं जरांगे म्हणाले आहेत.

★आरक्षणात मारलेल्या खुट्ट्या आम्ही उपटून फेकल्या : मनोज जरांगे पाटील

आम्ही मुंबईकडे कूच करत असताना आम्हाला सांगितलं जात होतं की तिकडे जाऊ नका काही होणार नाही ही पोरं तिकडे जाऊन राडा करतील असं बोललं जात होतं परंतु आम्ही आरक्षण घेणारच असं ठरवून घरून निघालो होतो. आम्ही 29 ऑक्टोबरला म्हटलं होतं आरक्षणात मारलेल्या खुट्ट्या आम्ही उपटून फेकणार ज्यांनी पाचर मारली ती काढून फेकणार मराठ्यांचा नाद करायचा नाही आम्हाला छेडण्याचा प्रयत्न केला तर आमचा ना इलाज आहे. आम्ही आताही गाव खेड्यात ओबीसी आणि मराठ्यांमध्ये वाद होऊ दिला नाही. यापुढेही होऊ देणार नाही कारण आम्ही लहान मोठे भाऊ म्हणून गुण्या गोविंदाने राहतो शिंदे साहेब आज उजळलेल्या गुलालाचा अपमान होऊ देऊ नका अशी विनंती मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली.

★राज्यभरातील गुन्हे मागे घेतले जाणार

अंतरवाली सराटीसह राज्यभर विविध मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते हे गुन्हे मागे घेण्याची ही मागणी मनोज जरांगे पाटलांनी केली होती ही मागणी मान्य झाली असून गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती त्यांनी दिली.

★मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांना विजयाचा गुलाल लावला

मनोज रंग यांनी आंदोलनावेळी घोषणा केली होती की मराठा आरक्षण घेणार आणि मुंबईत विजय गुलाल उधळणार परंतु मुंबईत दाखल होण्यापूर्वीच राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलन स्थळी जाऊन जरांगे यांना विजयाचा गुलाल लावला.

★मुख्यमंत्र्याच्या हातून ज्यूस पिऊन मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सोडले

मनोज जंगी पाटील यांनी त्यांचा उपोषण सोडला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःवासी येथे मनोज जरांगे यांच्या आंदोलन स्थळी जाऊन मनोज जरांगे यांना फळाचा ज्यूस दिला जरांगे पाटलांनी रस पिऊन उपोषण सोडले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!