6.3 C
New York
Tuesday, April 1, 2025

Buy now

spot_img
spot_img

आदर्श माता माँसाहेब जिजाऊ

आदर्श माता माँसाहेब जिजाऊ

आज 12 जानेवारी म्हणजे हिंदवी स्वराज्य संकल्पक आपल्या संस्काराने जिने एक नव्हे तर दोन छत्रपती घडवणारी रणरागिणी राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ यांची जयंती त्यानिमित्त सर्वप्रथम मासाहेब जिजाऊ चरणी मी नतमस्तक होऊन माझ्या लेखणी ला थोडी दर देतो याच महाराष्ट्राला ज्यांनी आपल्या रक्ताने अभिषेक करून उद्याचा स्वराज्य हा ना कुठल्या आदिलशहाचा असेल ना कुठल्या मोगलशाही चा हा स्वराज्य रयतेचा कल्याणकारी जनतेचा स्त्री स्वातंत्र्याचा शिवशाहीचा असा ठामपणे आपल्या रुदय बाळगून जिनी हे स्वराज्याचे स्वप्न आपल्या संस्काराने वीर छत्रपती शिवाजी व संस्कृत पंडित छत्रपती धर्मवीर संभाजी सारखे दोन बलाढ्य वाघांना घडून स्वराज्याची स्वप्न साकार करूनच या मातीत विलीन झालेले आऊसाहेब मासाहेब राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या पराक्रमाचा त्यांच्या त्यागाचा त्यांच्या संस्काराचा त्यांच्या धाडशी नेतृत्वाचा त्यांच्या स्वराज्य पेर न्याच्या संकल्पनेचा पाडा हा अवघ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे.
देवगिरीचा वारसा सांगणारे जिजाऊंची माहेर तर संसार उदयपूरच्या राजघराण्याचा वारसा सांगणारे होते त्यांच्या तेजस्वी पुत्रास या दोन थोर घराण्यांचा राजकीय आणि संस्कृतिक वारसा प्राप्त झाला होता या घराण्यांच्या परंपरेची आठवण देऊन छत्रपती शिवाजी महाराजांना सुसंस्कृत करण्याचे कार्य जिजाऊंनी केले जिजामाता म्हणजे पुणे सामान्य स्त्री नव्हत्या वीर कन्या वीर पत्नी असे सन्मान त्यांच्या वाट्यास आले होते अशा वीर कन्या वीर पत्नी असणाऱ्या जिजाऊ आपल्या पुत्रावर घराण्यांचे संस्कार करून वीर माता झाल्या. धर्म व नीती यांना फार महत्त्वाचे स्थान छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात होते स्वधर्माचे रक्षण तर केलेच पाहिजे परंतु धर्माचे पालनही राजाने केली पाहिजे हा संस्कार जिजाऊंनी शिवाजी महाराजांना दिला धर्माचे पालन करणाऱ्यांचा विजय आणि धर्माने वागणार यांचा विनाश हे सूत्र त्यांनी बाल शिवाजीच्या मनावर बिंबविले म्हणूनच पुढे महाराजांच्या चारित्र्यास व कार्यास नैतिक व धार्मिक अधिष्ठान लाभले साहित्य चार्य बाळशास्त्री हरदास म्हणतात जिजाबाईंनी लहानग्या शिवरायांच्या अंत करणावर धर्मनिष्ठा स्वातंत्र्य चारित्र्य निष्ठा व स्वाभिमान यांचे जे संस्कार घडविले त्यामुळे सर्व अनुकूल व प्रतिकूल परिस्थितीत त्यां ची जीवन निष्ठा कायम राहिली दृढ धर्मनिष्ठा साधू संतावषयी असीम श्रद्धा साधेपणा व शुद्ध चारित्र्य इत्यादी देणग्या शिवाजी महाराजांना माती कडून मिळाल्या शिवाजी महाराजांना योग्य शिक्षण व प्रसाद देऊन त्यांच्याकडून मराठ्यांची स्वराज्य स्थापनेची सिद्धता जिजाबाईंनी करून दिली अनेक विपत्ति सहन करून जोहा सुयोग जिजाऊंनी घडून आणला त्यामुळे त्यांना राजमाता हे पद लाभून महाराष्ट्राचा भाग्योदय झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची प्रेरणा आपल्या माती करुन घेतली मराठ्यांचा स्वातंत्र्य राज्याचे चित्र त्यांच्यापुढे जिजाऊंनी उभे केले यासाठी आवश्यक असलेली चिकाटी सहनशीलता न्यायनिष्ठ सगुणाची जोपासना जिजाऊंनी केली शिवाजी राजा मध्ये सैतानांचा जुलमी पणा न येता तो एक प्रजाहित दक्ष व गरिबांचा कनवाळू राजा बनावा यासाठी जिजाऊंनी आपल्या सर्व शक्ती पणाला लावल्या पुण्याच्या जहागिरीची व्यवस्था पहाता पहाता शिवाजी महाराजांनी राज्यकारभाराचे शिक्षण जिजामाता कडून घेतले एवढेच नाही तर व्यायाम मैत्री स्वावलंबन जनसंपर्क धैर्य शिक्षण यातूनच शिवबा घडतील अशी परिस्थिती जिजाऊ माँ साहेबांनी उपलब्ध करून दिली. शहाजी राजांच्या मृत्यूनंतर जिजाऊंनी विधवा झाल्यानंतरही कर्तव्य श्रेष्ठ समजून स्वतःला स्वराज्य निर्माण कार्यात गुंतवून घेतले शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक शहाजीराजे समोर हवा असे जिजाऊंना वाटत होते पण काळाला ते मंजूर नव्हते शहाजीराजांच्या मृत्यूनंतर शिवाजी महाराजांना आधार देण्यासाठी जिजामाता खंबीरपणे उभ्या राहिल्या जिजाऊ स्वराज्याची स्फूर्ती होत्या महाशक्ती मातृशक्ती होत्या 1642 ते 1674 या दरम्यान घडलेल्या अनेक महत्त्वपूर्ण घटनांवर जिजामातेचा प्रभाव पोस्ट दिसून येतो स्वराज्य स्थापनेचे श्रय याचे संकल्पक शहाजीराजे आणि त्यांना पूर्ण साथ आणि प्रोत्साहन देणाऱ्या त्यांची पत्नी जिजामाता यांचे होते हे खरे असले तरी पण शहाजी राजांनी बहुतांशी दूर राहून शिवरायांना सहाय्य केले जिजामातेने मात्र शिवरायांबरोबर राहून आपली आपल्या पतीची संकल्पना त्यांचे हातून पूर्ण करून घेतली आणि त्यांचा राज्याभिषेक सोहळा ही आपल्या डोळ्यांनी पाहूनच अखेरचा श्वास घेतला शिवाजी राजां चे पालनपोषण संगोपन त्यांना उत्कृष्ट शिक्षण संस्कार देण्याची व्यवस्था जिजामातांनी केली थोडक्यात जिजाऊ माँसाहेबांनी शिवाजीराजांवर संस्कार केले त्यांच्या मनात स्वातंत्र्य राष्ट्रनिर्मितीचे बीजारोपण केले हे स्वराज्य अस्तित्वात येण्यासाठी शिवरायांना मार्गदर्शन करून त्यांनी खंबीरपणे पाठराखण केली जिजाऊंच्या कार्यकर्तृत्वाची छाप इतकी होती की शिवाजीराजे स्वयंपूर्ण झाले असताना सुद्धा जिजाऊंचा सल्ला घेत असत आणि तो सल्ला मानत असत त्यामुळे जिजामाता ह्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुख्य प्रेरणास्त्रोत होत्या हे स्पष्ट होते शिवाजी राजे राज्यकारभार करीत असताना काही चुकले तर त्यांना जिजामाता समज देत असत शिवाजी राजांनी अनेक विजय मिळवले अनेकदा शिवाजी महाराज प्राणांतिक संकटातून थोडक्यात बचाव ले शिवनेरी किल्ल्यावर महाराजांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला या राज्याभिषेकानंतर जिजाऊ आजारी पडलेल्या यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत होती राज्यकारभारात राहूनही शिवाजी महाराज जिजाऊंची काळजी घेत होते अखेर 17 जून 1674 ला जिजाऊ माँ साहेबांनी या जगाचा निरोप घेतला हिंदवी स्वराज्याची स्फूर्ती मातृशक्ती राजमाता जिजाऊ माँसाहेबांना आज त्यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम…!

✍🏻प्रा.सचिन पवार
मो.9921801919

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!