8.4 C
New York
Wednesday, April 2, 2025

Buy now

spot_img
spot_img

शिवसेनेची जबाबदारी मुकुंद शिंदे यांच्या खांद्यावर!

★पाटोद्यातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्याकडून शिवसेना तालुकाप्रमुख मुकुंद शिंदे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव!

पाटोदा | प्रतिनिधी

हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराच्या वारसा घेऊन चालणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पाटोदा तालुका अध्यक्षपदी निष्ठावंत कडवट सैनिक मुकुंद शिंदे यांची निवड झाल्याने पाटोदा तालुक्यातील सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्याकडून त्यांच्या निवडीबद्दल शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे.
पाटोदा तालुक्यामध्ये शिवसेनेचे झाड उभा करण्यामध्ये मुकुंद शिंदे यांचा महत्त्वाचा वाटा असून सर्वच पक्षांना शिवसेनेची सुद्धा ताकद काय आहे ती नगरपंचायत निवडणुकीमध्ये दाखवून दिली आहे. पाटोदा नगरपंचायत निवडणुकीमध्ये प्रथमच सर्व उमेदवार उभे करून त्यांनी अगदी काही उमेदवारांना थोडक्यात पराभव स्वीकारावं लागला परंतु आजपर्यंत अशी शिवसेनेची ताकद कोणीच दाखवून दिली नाही ती मुकुंद शिंदे यांनी दाखवून दिल्याने त्यांच्यावर पक्षाने अधिक विश्वास दाखवत पाटोदा तालुक्याच्या अध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्यामध्ये टाकली असून येणाऱ्या काळात शिवसेनेला नक्कीच उभारी मिळवून देण्यासाठी मुकुंद शिंदे काम करतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. पाटोदा तालुक्याच्या अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडल्यानंतर पाटोदा तालुक्यातील सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्याकडून शिवसैनिकांकडून त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

★हिंदुत्व-ठाकरे कुटुंब म्हणजेच शिवसेना , येणाऱ्या काळात शिवसेनेची ताकद दाखवू – मुकुंद शिंदे

पाटोदा तालुक्यामध्ये अनेक वर्षापासून शिवसेनेची ताकद आहे परंतु त्याला चालना देण्याचे काम करण्यात आलं नव्हतं पाटोदा नगरपंचायत निवडणुकीमध्ये आम्ही ते दाखवून दिल्याने पक्षाकडून ही मोठी जबाबदारी मला मिळाली आहे येणाऱ्या काळात शिवसेनेची ताकद अधिक दाखवून देऊ आणि हिंदुत्व ठाकरे कुटुंब आणि शिवसेना काय आहे हे सुद्धा येणाऱ्या काळात सिद्ध करून शिवसैनिक दाखवल्याशिवाय राहणार नाहीत.
– मुकुंद शिंदे
नवनिर्वाचित तालुकाप्रमुख पाटोदा.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!