जिद्द, कार्यक्षमता आणि उत्साह म्हणजे माजी सरपंच साहेबराव बेद्रे पाटील!
——————————–
विशेष लेख
– प्रा.बिभिषण चाटे
‘…झाडांचे हिरवे वैभव, पानाफुलांचे रंग गंध, भिरभिरणारे फुलपाखरे.. थुई थुई नाचताना हसणारे पाणी, फांद्या फांद्यावरील पक्षी.. ऊन सावल्यांची नक्षी.. अशा चैतन्यमय निसर्ग सोहळ्याशी एकरूप राहणारा माणूस सदैव आनंदी आणि उत्साही असतो असे म्हणतात. अगदी त्यालाच अनुसरून धार्मिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक क्षेत्राची आवड असणारे व्यक्तिमत्व साहेबराव जिजा बेदरे पाटील यांचा उत्साह जिद्द परिश्रम आणि मानसे जोडण्याची हातोटी विशेष कौतुकास्पद आहे.
साहेबराव जिजा बेदरे पाटील हे बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यातील निरगुडी येथील माजी सरपंच आहेत. 2010 ते 2015 या पाच वर्षांतील सलग कार्यकाळात या पदावर कार्यरत राहून लोकप्रियता मिळवली आहे. 5 जानेवारी 1965 रोजी जन्मलेल्या बेद्रे पाटलांनी अगदी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणापासूनच जिद्द चिकाटी परिश्रम आणि मेहनतीच्या बळावर व्यवसाय शेती करत प्रवास करण्याला अर्थात भ्रमण या आवडीच्या विषयाला प्राधान्य दिले. म्हणूनच आज पर्यंत त्यांनी संपूर्ण भारतभर प्रवास करण्याचा योग त्यांच्या आत्मविश्वास आणि जिद्दीच्या बळावर करून दाखवला आहे.
राष्ट्रपुरुष आणि संत यांच्या कर्तुत्वाने पूनीत केलेल्या गड किल्ले आणि धार्मिक क्षेत्रांना जाणीवपूर्वक भेटी देऊन पदस्पर्श केला आहे.
बी.कॉम. ही पदवी घेऊन शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक पुस्तकांचे वाचन केले. सामाजिक राजकीय क्षेत्राची आवड असलेल्या साहेबराव बेंद्रे पाटलांनी आयुर्विमा महामंडळामध्ये एजंट म्हणून काम स्वीकारले आणि प्रचंड मेहनतीच्या बळावर अनेक वर्ष त्यांनी या क्षेत्रात चेअरमन क्लब मेंबर या पदापर्यंत मजल मारली.
निरगुडीचे माजी सरपंच म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवलेला आजही तालुक्यातील विविध गावांमध्ये त्यांच्या परीचयावरुन लक्षात येत. पत्नी महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा परिषद विभाग अंतर्गत महिला आणि बालकल्याण विभागामधून नुकत्याच पर्यवेक्षिका पदावरून सेवानिवृत्त झाल्या आहेत. तर मुलगा रुपेश साहेबराव बेंद्रे हे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस म्हणून सामाजिक आणि राजकीय कर्तव्य प्रमाणिकपणे पार पाडताना दिसतात. तर दुसरे चिरंजीव निलेश उच्च शिक्षण घेऊन व्यवसायात स्थिरावले आहेत.
माणुसकी, निसर्गाशी समरसता कृषीविषयक प्रेम श्रद्धा आणि विशेषतः ग्रामीण खेडेगावातील समूहजीवन यासंबंधीची पूर्ण जाणीव या परिवाराला आहे. बोलीत आपुलकी आणि स्नेहाचा गोडवा असल्यामुळे त्यांनी माणसे जोडली. संवाद हा माणूसपणाचा धर्म असतो याची पूर्ण कल्पना असल्यामुळे आणि शब्द सामर्थ्यावर सार्थ विश्वास असल्याने त्यांनी शहरात वास्तव्य करून सुद्धा ग्रामीण भावविश्वासी आणि कृषी संस्कृतीशी नाते कायम ठेवले आहे.
आज अशा या विविध संस्कृतीशी संवेदनशील मनाने प्रमाणिक नाते जपणाऱ्या लोकाभिमुख व्यक्तिमत्त्व अर्थात माजी सरपंच साहेबराव जिजा बेदरे पाटील यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या आजपर्यंतच्या सामाजिक भूमिकेला व्यापक स्वरूप प्राप्त व्हावं, छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी राजे आणि संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज यासारख्या संत सज्जनांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहून त्यांना दीर्घायुष्य लाभावं, यासाठी मनापासून शुभेच्छा..!
★भरतभर प्रवास; ऐतिहासिक, धार्मिक स्थळांना नतमस्तक!
आपली प्रत्येक कृती आणि त्यामागचा भाव हा राष्ट्र समर्पणाचा, राष्ट्रहिताचा असावा या मूल्यात्मक भावनेतून साहेबराव बेदरे पाटील यांनी आजपर्यंतच्या आयुष्यात संपूर्ण भारतभर प्रवास केलेला आहे. महाराष्ट्रातील विशेषतः ऐतिहासिक स्थळे आणि धार्मिक स्थळांना भेटी देऊन त्या पुण्य स्थळांना नतमस्तक होण्यात त्यांनी स्वतःला धन्य मानले. तुळजाभवानी मातेवर या परिवाराचे निश्चिम श्रद्धेचे नाते आहे.