सलग चार वर्ष आंतरराष्ट्रीय क्षेत्रात सर्वोच्च समजला जाणारा एमडीआरटी अमेरिका पुरस्कार प्राप्त
बीड | प्रतिनिधी
शिरूर कासार तालुक्यातील शिरापूर धुमाळ (बहिराचे) येथील तरूण युवक विमा प्रतिनिधी सत्यवान लहू बहिरने एल.आय. सी क्षेत्रात 4 वर्षात गगन भरारी घेतली आहे. 4 वर्षापूर्वी अत्यंत हालाखीचे जीवन जगत असलेल्या या युवकाचे यश कौतुकास पात्र आहे. शिरूर कासार तालुक्यातील नवगण राजुरी जवळ असलेल्या शिरापुर धुमाळ (बहिराचे) येथील सत्यवान लहु बहीर या युवकाने एल. आय. सी. क्षेत्रात मोठी उल्लेखनीय कामगिरी केली असून मेहनत, जिद्द, चिकाटी व ईमादारीने काम केले. गेल्या चार वर्षापासून त्यांच्या जीवनात त्यांनी विमाविषयक सेवा देण्यात सातत्य राखले आहे कोणतेही कार्य एल आय सी विषयक असो मृत्यू दावे, पॉलिसी लोन, नवीन प्लॅन ते एकाच दिवसात पूर्ण करतात. विशेष म्हणजे सत्यवान बहिर हे मुलींचे लग्न, मुला मुलींचे शिक्षण व भविष्य तसेच पेन्शन व रिटायरमेंट फंड याविषयी ते स्पेशालिस्ट आहेत.
औरंगाबाद विभागातील गोल्ड मेडल घेऊन बीड जिल्ह्यातील सन १९-ते 22 मध्ये जिल्ह्यात नं १ राहिल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला. तीन ते चार महिण्यात अत्यंत चिकाटीची मेहनत घेऊन एम. डी. आर. टी. हा जागतिक स्तरावरील बहुमान मिळवल्याने औरंगाबाद विभागाने त्यांचा सत्कार केला. यशस्वी वाटचाली बद्दल त्यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.विकास अधिकारी माननीय श्री अमर फपाळ साहेब,माननीय शाखाधिकारी श्री संदीप जोशी साहेब, उपशाखाधिकारी माननीय श्री पवन मानकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जोमाने काम केले. . यशस्वी वाटचाली बद्दल त्यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.