मराठा आरक्षण व मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ पै.सतिष शिंदे यांच्या वाढदिवसाचे सर्व कार्यक्रम रद्द!
★विविध सांस्कृतिक, सामाजिक उपक्रमाने साजरा होणारा वाढदिवस यावेळी मराठा आरक्षणासाठी स्थगित
आष्टी | सचिन पवार
आष्टी मतदार संघाचे युवा नेतृत्व हजारो युवकांचे हक्काचे नेतृत्व म्हणून सतिष आबा शिंदे यांच्याकडे पाहिले जातात दरवर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त चार जानेवारी रोजी विविध सांस्कृतिक सामाजिक उपक्रम घेऊन वाढदिवस साजरा केला जातो परंतु यावर्षी मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय सतीश शिंदे यांनी घेतला असून त्यांच्या निर्णयात हजारो युवकांनी स्वागत केले असून पुढचा वाढदिवस आरक्षण मिळाल्यावरच आणि तोही दणक्यात साजरा करू असेही युवकांकडून सांगण्यात आले आहे.
पैलवान सतीश आबा शिंदे नेहमीच सर्वांच्या सुखदुःखामध्ये धावून जातात आणि सर्वांचे दुःख सुख हे स्वतःच सुख दुःख समजून सर्वांनाच आपलं सुख करतात त्यामुळे हजारो युवक त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक सांस्कृतिक उपक्रम घेऊन त्यांचा वाढदिवस साजरा करत असतात परंतु यावर्षी पैलवान सतीश आबा शिंदे यांनी मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतल्याने हजारो युवकांच्या आनंदावर निर्जन पडलं असेल परंतु त्याच युवकांनी त्यांच्या या महत्त्वाच्या निर्णयाचे स्वागत केले असून पुढचा वाढदिवस आपण मराठा आरक्षण मिळाल्याबरोबरच मोठ्या उत्साहात आणि दणक्यात साजरा करू असे देखील जाहीर केले आहे. चार जानेवारी रोजी सतीश आबा शिंदे यांचा वाढदिवस दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि सामाजिक सांस्कृतिक उपक्रमाने होतो हे संपूर्ण बीड जिल्ह्याने पाहिले आहे परंतु यावर्षी मराठा आरक्षणाचा मुद्दा अतिशय जिव्हाळ्याचा असून समाज महत्त्वाचा आणि समाजाला मिळालेले मनोज जरांगे यांचे नेतृत्व महत्त्वाचे समजून सतीश शिंदे यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.
★आधी मराठा आरक्षण ; वाढदिवस पुढच्या वर्षी करू – पै.सतीश शिंदे
मराठा समाजासाठी आरक्षण किती महत्त्वाचे आहे हे मी सुद्धा जाणून आहे आजपर्यंत अनेक महत्त्वाची आंदोलन मोठी आंदोलने झाले परंतु मनोज जरांगे पाटील यांच्यासारखे खमके नेतृत्व न मिळाल्यामुळे आरक्षणाचा मुद्दा अधिकच रेंगळत चालला होता परंतु त्यांच्या नेतृत्वामुळे मराठ्यांचे आरक्षण अगदी जवळ आले आहे मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे यांना समर्थन म्हणून यावर्षी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.
– पै.सतीश आबा शिंदे
जि.प.सदस्य व जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बीड.