14.7 C
New York
Saturday, April 5, 2025

Buy now

spot_img
spot_img

पाटोदा शहराला मिळणार आठ दिवस ऐवजी आता पाच दिवसांनी जलपुरवठा!

नगराध्यक्षांकडून शहरवासीयांसाठी नवीन वर्षात पाणीपुरवठ्यावर उत्कृष्ट नियोजन 

★नागरिकांनी नळाला तोटी बसून पाण्याचा अपव्यय टाळा – नगराध्यक्ष राजुभैय्या जाधव

पाटोदा | सचिन पवार

पाटोदा नगरपंचायतीचा नगराध्यक्षपदी लोकप्रिय नगरसेवक राजू भैय्या जाधव विराजमान झाल्यापासून शहरवासीयांच्या अपेक्षा उंचावले आहेत. नवीन वर्षात सहवासीयांना मुबलक पाणीपुरवठा व्हावा यासाठी नियोजन करण्यात आले असून नगरपंचायत हद्दीत आता आठ दिवसाऐवजी दर पाच दिवसाला मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा केला जाणार आहे यासह जलअपव्यय टाळण्यासाठी आता नळाला तोट्या देखील बसवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती नगराध्यक्ष राजुभैया जाधव यांनी दिली आहे.
पाटोदा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महासांगवी तलावात यंदा मुबलक पाणी साठा असून शहर हद्दीतील नागरिकांना पाण्याविषयी कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी आमदार सुरेश आण्णा धस यांच्या सूचनेनुसार पाटोदा नगरपंचायत कार्यालयात पाणीपुरवठा विभागाची बैठक घेण्यात आली. यामध्ये पाटोदा शहराला एक जानेवारीपासून नागरिकांच्या सुविधेसाठी प्रत्येक पाच दिवसाला पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरात साधारणता दोन ते अडीच हजारांच्या आसपास नळांची संख्या असून प्रत्येक वेळी पाणी आल्यानंतर आवश्यक तेवढे पाणी भरल्यानंतर अनेक वेळा नागरिक पाणी अक्षरशः नालीत सोडतात व त्यामुळे पाण्याचा मोठा अपव्यय होतो ही बाब टाळण्यासाठी आता नळांना तोटे बसवण्यात येणार असून पुढील एक महिन्यात हे काम होणार असल्याची माहिती सुद्धा देण्यात आली आहे. नगराध्यक्ष राजूभैय्या जाधव यांच्या या निर्णयाचं नागरिकांकडून स्वागत केलं जात आहे.

★पाणी म्हणजे जीवन हे लक्षात ठेवून पाण्याचा अपव्यय टाळा

पाटोदा नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या नागरिकांना पाण्याची सोय मुबलक प्रमाणात व्हावी यासाठी पुरेपूर प्रयत्न सुरू आहेत तसेच नागरिकांना पुरेशी पाणी मिळावे यासाठी दर पाच पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. नागरिकांनी पाणी म्हणजेच जीवन हे लक्षात ठेवून पाण्याचा अपव्यय टाळावा लवकरच नळांना तोट्या देखील बसवण्यात येतील आणि नागरिकांना पुरेशी पाणी मिळेल.
– राजूभैय्या जाधव
नगराध्यक्ष नगरपंचायत पाटोदा.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!