संत भगवानबाबांच्या जन्मभूमीच्या सर्वांगीण विकासासाठी धडपडणारे – लोकप्रिय युवा सरपंच इंजि.संदेश सानप
त्याग, कष्ट, प्रामाणिकपणा आणि संकटाचा धैर्याने सामना ही जीवनमूल्ये उपजतच अंगी असल्याने आपल्या आई वडील,काका यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आजी आजोबा आणि कुटुंबातील सर्व ज्येष्ठांच्या आशीर्वादावर मायबाप गावच्या सर्वसामान्य ग्रामस्थांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जीवाचे रान करणारा युवा लोकप्रिय सरपंच म्हणून इंजिनियर संदेश सानप यांच्या नावाची चर्चा संपूर्ण पाटोदा शहरात अत्यंत सन्मानपूर्वक केली जाते.
राष्ट्रसंत भगवान बाबा, वैराग्यमूर्ती संत वामनभाऊ महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली पाटोदा तालुक्यातील श्रीक्षेत्र सावरगाव घाट ही भूमी आहे. संत भगवान बाबांचे जन्मस्थळ म्हणून राज्य आणि देशभर या भूमीचा नावलौकिक आहे. येथील माती कपाळावर लावण्यात जगभरातील जनता धन्य मानते. अशा या अत्यंत पवित्र पुण्यवान भूमीतील प्रथम नागरिक तथा सरपंच होण्याचा बहुमान अत्यंत कमी वयात लाभण्याचे भाग्य इंजिनिअर संदेश सानप यांना एक वर्षांपूर्वी भेटले आहे. या भागाचे संधीचे सोने करण्याचे कसब ताकद क्षमता कुवत नक्कीच उच्चशिक्षित असलेल्या संदीप भैय्या सानप यांच्यामध्ये आहे हे आता सर्वांनी मान्य केले आहे.
गेल्या एक वर्षापूर्वी सावरगाव घाट येथील युवकांचा हृदय व गळ्यात तील ताईत म्हणून संबोधल्या जाणाऱ्या इंजिनीयर संदेश सानप यांची एकमताने बिनविरोध सरपंच म्हणून निवड झाली. निवडीनंतर त्यांनी सर्व गावकऱ्यांना सर्व जाती धर्म पंथातील युवक कार्यकर्त्यांना सोबत घेत एकमेव गावच्या विकासाच्या अनुषंगाने पावले उचलले आहे. संत भगवान बाबांची ही जन्मभूमी आणि पुण्यभूमी असल्याने राज्यभरातील अनेक भाविक भक्त सातत्याने या गावात संत भगवान बाबांच्या दर्शनासाठी आणि आशीर्वादा साठी नतमस्तक होऊन येत असतात. आणि म्हणून येथील रस्ते पाणी वीज नाल्या यासह वृक्षारोपण अशा विविध लोकोपयोगी विकासाच्या योजना अत्यंत परिश्रमपूर्वक सरपंच इंजिनिअर संदेश सानप यांनी मोठ्या मेहनतीने सुरू केल्या आहेत.
लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या विचार आणि कार्यावर प्रचंड प्रेम करणारे हे गाव आहे. दुर्दैवाने त्यांच्या जाण्यानंतर हे गाव अक्षरशः पोरके झाल्याची जाणीव झाली. परंतु नियतीच्या पुढे आपण काहीही करू शकत नाहीत ही जाणीव ठेवून पुन्हा बीड जिल्ह्याच्या खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे, माजी मंत्री तथा गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गावच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व ग्रामपंचायत सदस्य ज्येष्ठ नागरिक आणि मान्यवर गावातील नेते आणि युवकांना सोबत घेऊन इंजिनिअर संदेश सानप अत्यंत सुयोग्य पद्धतीने वाटचाल करीत आहेत.दसरा मेळावा ही या गावची आता प्रमुख ओळख बनली आहे. त्यासाठी भव्य संत भगवान बाबांच्या पुतळ्यासमोर लाखो समाज आशीर्वादा साठी येतो. या भाविक भक्तांच्या सुविधांसाठी सरपंच इंजिनिअर संदेश सानप एक सामान्य भक्त म्हणून सातत्याने पुढे असतात.यशस्वी वाटचाल करताना भक्कम पाया हा आई-वडिलांचे संस्कार असतात. ही जाणीव ठेवून कष्ट आणि प्रमाणिक पणाच्या जोरावर सरपंच इंजिनियर संदेश सानप यांनी आपले आई-वडील, काका, आजी आजोबा यांच्या मार्गदर्शन व आशीर्वादा वर गावच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी उचललेले पाऊल निश्चितच भविष्यात ही अत्यंत दूरगामी राहील, यात शंका नाही.भाविक भक्तांसाठी सुविधा तसेच या पवित्र भूमीला पाहण्यासाठी आलेल्या दूर दूर वरून लोकांच्या साठी मार्गदर्शन तसेच स्वच्छता वृक्षारोपण आरोग्य सुविधा शिक्षण तसेच एकोपा याबरोबरच गावांमध्ये ऐक्य बंधुत्व सर्वधर्मसमभाव शांतता प्रगती या मूल्यांची रुजवण करण्यासाठी एक उच्चशिक्षित लोकप्रिय युवा सरपंच म्हणून इंजिनीयर संदेश सानप हे सक्षमपणे कार्य करीत आहेत याचा गावकऱ्यांना अभिमान वाटतोय..
आज 26 डिसेंबर अर्थात लोकप्रिय युवा सरपंच संदेश सानप यांचा अभिष्टचिंतन दिन आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गावकरी आणि युवा कार्यकर्ते गावामध्ये गोरगरिबांसाठी विविध उपक्रम राबवत आहेत. या सर्व सामान्य गोरगरीब दीनदलित दुबळा अनाथ अपंग शेतकरी शेतमजुरां सह ऊसतोड कामगारांचे आशीर्वाद या लाडक्या युवा सरपंच संदेश सानप यांच्या भविष्यातील यशदायी आनंदी जीवनासाठी मिळतील.. इंजिनीयर सरपंच संदेश सानप यांना अभिष्टचिंतन दिनाच्या खूप शुभेच्छा..!
★लोकप्रिय युवा सरपंच म्हणून क्रेझ; गावच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य!
गेल्या एक वर्षापासून संत भगवान बाबांची जन्मभूमी असलेल्या श्रीक्षेत्र सावरगाव घाट या अत्यंत पवित्र भूमीचे सरपंच होण्याची ही संधी अभ्यासू उच्चशिक्षित इंजिनीयर संदेश सानप सुदामराव सानप यांना मिळाली आहे. गावच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असून येत्या काळात गावकऱ्यांचे स्वप्न प्रत्यक्षात आणून या पवित्र भूमिचे नाव एक आदर्श ग्राम म्हणून राज्यात करू असा विश्वास सरपंच इंजिनिअरिंग संदेश सानप यांचा आहे. गावकऱ्यांच्या सोबत आणि साथीने ते करून दाखवतील असा विश्वास ग्रामस्थांनाही आहे.