मराठ्यांच्या शेतकऱ्याचं पोर जेव्हा कोटी मराठ्यांच्या काळजाचा तुकडा बनतो तेव्हा मराठ्यांकडून हेलिकॉप्टर अन् जेसीबीतून पुष्पवृष्टी!
★20 जानेवारीपासून बाईच्या आझाद मैदानावर मराठा योद्धा मनोज जरांगे पाटलांच आमरण उपोषण
[लोकवास्तव अंदाज!]
[ 20 जानेवारी पर्यंत सर्व मराठे कुणबी मराठे होतील ]
बीड | सचिन पवार
निर्णायक इशारा सभेपूर्वी शहरातून श्री. मनोज जरांगे पाटील यांची शहरातून निघालेल्या फेरीमुळे शहरभर गर्दी जमली. जागोजागी फेरीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. फेरीत 201 जेसीबींमधून तर सभास्थळी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. 12 वाजता सुरु झालेली फेरी साडेतीन वाजता सभास्थळी पोचली.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला श्री. जरांगे पाटील यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादनानंतर फेरीची सुरुवात झाली. माळीवेस, सुभाष रोडमार्गे फेरी अण्णा भाऊ साठे चौकात पोचली. या ठिकाणी अण्णा भाऊ साठेंच्या पुतळ्याला अभिवादन करुन छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला अभिवादन करण्यात आले.या ठिकाणी श्री. जरांगे पाटील यांचे भव्य स्वागत करण्यात आले. दरम्यान, धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बाह्यवळण रस्त्याच्या छत्रपती संभाजी महाराज चौक परिसरात पाटील मैदानावर झालेल्या सभेला जिल्ह्यासह बाहेर जिल्ह्यातूनही समाज बांधवांनी उपस्थिती लावली.सभास्थळी जागा न भेटलेले धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या चौफळ्यावर उभारल्याने सभाकाळात वाहतूक पूर्णपणे ठप्प राहिली. सभास्थळी तांदळाची खिचडी, शाबू खिचडी व पाण्याची सोय करण्यात आली होती. शहरातही विविध ठिकाणी फेरीतील सहभागींच्या चहा- पाण्याची सोय करण्यात आली होती.
★शांतता भंग करणाऱ्यांनाही सुनावले
मुंबईतील उपोषणाला येताना कोणी शांतता भंग केली तर तो आपला नाही असे समजायचे, भलेही समाजाचा असला तरी त्याला पोलिसांच्या हवाली करा, असेही मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी बीड येथील झालेल्या इशारासभेतून स्पष्ट सांगितले.
★मुस्लिमबांधवांकडूनही जंगी स्वागत
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या बीड येथे होणाऱ्या इशारा सभेसाठी निघालेल्या फेरीचे बार्शी नाका भागात मुस्लिम समाज बांधवांनी जंगी स्वागत केले.यावेळी परिसरातील मुस्लिम समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
★मी मॅनेज होत नाही हा सरकारचा प्रॉब्लेम
मी मॅनेज होत नाही हा हाच सरकारचा प्रॉब्लेम आहे मी जिवंत असेपर्यंत मराठा आरक्षण मिळून देणारच मराठा समाज आणि माझं नातं हे माय लेकाचं आहे. मराठा समाजाच्या पुढच्या पिढीला आरक्षण मिळवून देणार या आधीच्या पिढीचे आयुष्य आरक्षणाविणा उध्वस्त झालं आता मराठा जागा झाला आहे.
★त्या आमदारांना दारात सुद्धा उभा करू नका
मराठा आंदोलनासाठी समाजाला सात न देणाऱ्या आमदार खासदार यांना यापुढे दारातही उभे करू नका असा आव्हान म्हणत जरांगे यांनी केले मनोज जरांगी म्हणाले की आज पर्यंत मराठ्यांच्या जीवावर हे आमदार खासदार झाले पण मराठा आरक्षणाच्या विषयावर किती जण पुढे आले आता यापुढे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जे साथ देणार नाहीत त्या आमदारांना दारातही उभा करू नका जे मराठा आरक्षणासाठी लढले तोच आपला.
★शांततेत आंदोलन करा तेच आपले ब्रह्मास्त्र!
सरकारने पुन्हा एकदा डाव रचला मराठा समाजातील आंदोलकांना नोटीसा दिल्या ट्रॅक्टर घेऊन सभेला गेला तर तो जप्त केला जाईल असं त्यात म्हटले महाराष्ट्रात त्या मराठ्यांनी आंदोलन करायचं पण शांत देत तेच आपलं ब्रह्मास्त्र आहे शांततेत आंदोलन केल्यास ते थांबवायचं कोणाच्यातच हिंमत नाही.
★सरकारला आणखी 25 दिवसाचा अल्टिमेट!
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट केली आहे 20 जानेवारीपासून मुंबईतील आझाद मैदानात मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषण करणार आहेत ते मराठा समाजासोबत मुंबईत आमरण उपोषण करिता दाखल होणार आहेत. त्याबाबतीचे स्पष्टता अध्याप तरी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून देण्यात आलेली नाही पण महत्त्वाची बाब म्हणजे मनोज जणांनी सरकारला आणखी 25 दिवसाचा अल्टिमेट दिला आहे.
★नादाला लागल तर राजकीय अस्तित्व संपणार
राज्य सरकारला इशारा देताना जणांनी म्हणाले की राज्य सरकारने शहाणपणाची भूमिका घ्यावी त्या एकट्याचं ऐकून जर तुम्ही आमच्या विरोधात भूमिका घेणार असाल, आरक्षणामध्ये आडकाठी करणार असाल तर शहाणे व्हा मराठा समाजाला ताटकळत ठेवू नका नाहीतर शांततेत तुमचा सुप्रस साफ केला जाईल तुमचं राजकीय अस्तित्व संपवला जाईल तुम्ही ठरवल्याप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण द्या नाहीतर पुढचं आंदोलन तुम्हाला शंभर टक्के जड जाणार.
★भव्य रॅली आणि ठिकठिकाणी पुष्पवृष्टी!
मराठा इशारा सभेसाठी मनोज जरांगे पाटील यांचे बीड येथे आगमन झाल्यानंतर बीड शहरातून मनोज जरांगे पाटील यांची मोठी भव्य रॅली काढण्यात आली डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून, अण्णाभाऊ साठे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना अभिवादन करत बार्शी नाका मार्गे रॅली सभास्थळी पोहोचली रॅली दरम्यान ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जेसीबीच्या माध्यमातून सभास्थळी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करण्यात आली हा क्षण इतिहासात नोंद केला जाणारा होता.
★भुजबळ महाराष्ट्राला कलंक!
बीडच्या सभेतून मनोज जरांगे यांनी पुन्हा छगन भुजबळ यांच्यावर टीका करत मी छगन भुजबळ ला उलथा पालथा करतो माझ्या नादी कशाला लाखायचं निशांत बसलो तरी माझ्याबद्दल काहीही बोलतो छगन भुजबळ महाराष्ट्राला कलंक आहे आरक्षण मिळून द्या मग कचका दाखवतो माझ्या नादी लागू नका मी लय बेकार माणूस आहे असं जरा अंगणी भर सभेतून आव्हान केलं.