★बीड येथे होणार मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत आरक्षणासाठी निर्णय सभा
पाटोदा | प्रतिनिधी
बीड येथे छत्रपती संभाजी महाराज चौक बीड बायपास येथिल पाटिल मैदानावर मराठा क्रांतीसुर्य मनोज जरांगे पा यांची दि २३रोजी निर्णायक इशारा सभा होत असुन या सभेला मराठा समाजातील सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन डोंगरकिन्ही जि प गटाचे सदस्य तथा बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योजक ॲड प्रकाश कवठेकर यांनी केले आहे.
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गात आरक्षणासाठी मराठा क्रांतीसुर्य मनोज जरांगे पा यांनी अनेक संघर्ष केले आहेत.शासनाने प्रत्येक वेळेस शब्द देऊन विश्वासघात केला आहे.मराठा समाजाला आरक्षण नसल्याने मराठा तरुणांना शैक्षणिक व नोकरीला मुकावे लागते.हा लढा गरजवंत मराठा आरक्षणासाठी आहे.मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणुन सर्वच पक्षांचा पाठिंबा दर्शविला आहे.मनोज जरांगे पा यांच्या नेतृत्वाखाली तमाम मराठा समाजाने संघर्ष सुरू केला आहे.हा संघर्ष तेवत राहील अशी व्यवस्था केली असुन मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी शासनाला दि २४पर्यंत वेळ दिला आहे.तरीही शासनाने अद्याप काही निर्णय घेतला नाही.परिणामी बीड येथे छत्रपती संभाजी महाराज चौक बीड बायपास येथिल पाटिल मैदानावर मराठा आरक्षणासाठी निर्णायक इशारा सभा होत आहे.मनोज जरांगे यांच्या इशाऱ्यानंतर संपूर्ण मराठा समाज निर्णायक लढा पुकारणार आहेत.या सभेला येणाऱ्या तमाम मराठा समाजातील सर्वांची व्यवस्था करण्यात आली आहे.शंभर च्या वर एकरांवर ही सभा होत असुन बीड शहरातील संपूर्ण मराठा बांधव या सभेसाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत.या सभेला बाहेरील जिल्ह्यातील मराठा बांधवही उपस्थित रहाणार आहे.या सभेला येणाऱ्या मराठा बांधवांना कसलीही गैरसोय जाणवणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे.या निर्णायक इशारा सभेला बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन डोंगरकिन्ही जि प गटाचे सदस्य तथा उद्योजक ॲड प्रकाश कवठेकर यांनी केले आहे.