पाटोदा तालुक्यातील हजारो मराठे इशारा सभेला उपस्थित राहणार
★23 डिसेंबरला होणारी बीड येथे इशारा सभा ठरणार महत्त्वाची
पाटोदा | सचिन पवार
मराठा योद्धा मनोज जरांगे ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये 23 डिसेंबर रोजी बीड येथे इशारा सभा होणार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सध्या मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आहे. सरकारने देखील थोडी सकारात्मकता दाखवून 24 डिसेंबर रोजी सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची घोषणा करावी याच मागणीसाठी मराठ्यांचा हट्टा असा आहे आणि तो सरकारने पूर्ण करावा हीच अपेक्षा घेऊन सरकारला पुन्हा एकदा मराठा समाजाची खदगद दाखवण्यासाठी बीड येथे होणारी इशार सभा ही महत्त्वाची ठरणार आहे त्यामुळे प्रत्येक गाव खेड्यातून या सभेसाठी येणार असल्याचे सुद्धा सांगण्यात येत असून पाटोदा तालुक्यातून हजारो मराठे बीड येथील इशारा सभेसाठी येणार असल्याचं मराठा समाजाकडून सांगण्यात आला आहे.
पाटोदा तालुक्यातील सर्व गावात सकल मराठा समाजाच्या वतीने संवाद दौरा केला असून हजारो मराठी बीड येथील इशारा सभेसाठी येणार असल्याचे सांगितले आहे. प्रत्येक गावामध्ये होर्डिंग लावून लाईट स्पीकर च्या माध्यमातून जनजागृती करून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आव्हान देखील सकल मराठा समाज पाटोदा तालुक्याच्या वतीने करण्यात आले असल्याची माहिती मराठा सेवक बाबा तिपटे यांनी सांगितले आहे.
★पाटोद्यातून हजारो मराठी उपस्थित राहणार – बाबा तिपटे
मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बीड येथील इशारा सभेसाठी पाटोदा तालुक्यातून हजारो मराठा बांधव उपस्थित रहावे यासाठी प्रत्येक गावामध्ये जाऊन जनजागृती केले असून पाटोदा तालुक्यातील हजारोंच्या संख्येने मराठा बांधव बीड येथील इशारा सभेसाठी उपस्थित राहणार आहेत.
– बाबा तिपटे
मराठा सेवक पाटोदा.