चंपाषष्ठी निमित्त कुसळंबनगरीत भंडारा उधळत खंडेश्वराचा जयघोष
★भंडाऱ्याची उधळण, येळकोट येळकोटचा जयघोष करत हजारो भक्तांनी घेतले खंडेरायाचे दर्शन!
कुसळंब | सचिन पवार
महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडेरायाच्या प्रती जेजुरीत म्हणजेच बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील कुसळंब गावचा खंडोबा जागृत देवस्थान प्रसिद्ध असल्याने पाटोदा तालुक्यातूनच नव्हे जिल्हाभरातून इतर जिल्ह्यातून सुद्धा नागरिक दर्शनासाठी चंपाषष्टी निमित्त हजारोंच्या संख्येने आले होते. बेल भंडाराची उधळण करत येळकोट येळकोट जय मल्हार जय घोषणा कुसळंबनगरी दुमदुमून निघाली होती.
पाटोदा तालुक्यातील कुसळंब येथील जागृत देवस्थान खंडोबा दर्शनासाठी जिल्हाभरातून हजारो भक्त चंपाषष्ठी निमित्त कुसळंब नगरीत आले होते येळकोट येळकोट जय मल्हार आणि बेल भंडाराच्या उधळण करत हजारो नागरिकांनी श्रीक्षेत्र खंडोबाचे दर्शन घेतले. प्रसिद्ध असे खंडोबा मंदिराचा जनार्दन करण्यात आला हे मंदिर अत्यंत भव्य भव्य दिव्य सर्व सोयी सुविधा युक्त असे आहे. मंदिराची आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण मंदिराचे सुंदर रूप पाहून येणाऱ्या प्रत्येक भाविकाचं मन प्रसन्न होता खंडेरायाची अत्यंत आकर्षक अशी भव्य मूर्ती सर्वांनाच आकर्षित करते चंपाषष्टीनिमित्त कुसळंबनगरी सोनेरी रंगाने नाहून निघाली होती. येणाऱ्या भाविक भक्तांसाठी ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
★वर्षातून तीन वेळा खंडोबाचा भव्य दिव्य उत्सव!
श्री शेत्र खंडेश्वर देवस्थान कुसळंब येथे वर्षातून तीन वेळा भव्य दिव्य असा उत्सव साजरा केला जातो यामध्ये चंपाषष्ठीला भव्य दिव्य यात्रा पालखी मिरवणूक असते त्याचप्रमाणे पौष महिन्यात या ठिकाणी खंडोबा व म्हाळसा विवाह सोहळा तर चैत्र पौर्णिमेला तीन दिवस खंडोबाची यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो.
★हजारो भाविक भक्तांनी घेतले खंडेरायाचे दर्शन!
चंपाषष्ठी निमित्त कुसळंब येथील खंडेरायाच्या दर्शनासाठी हजारो भाविक भक्तांनी एकच गर्दी केली होती. मंदिरामध्ये सकाळी तळी उचलून खंडेरायाच्या यात्रा उत्सवाला सुरुवात करण्यात आली गावांमधून पालखी मिरवणूक काढली. भव्य पालखी मिरवणूक सोहळा झाला. मंदिरासमोर बेल भंडाऱ्याची उधळण करत येळकोट येळकोट जय मल्हार चा जयघोष करत हजारो भाविक भक्तांनी दर्शन घेतले.
★श्रीक्षेत्र खंडेरायाचा भंडारा म्हणजेच अंतिम शब्द होय!
कुसळंबचे कुलदैवत श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान हे जागृत देवस्थान असल्याने येथील भंडाऱ्याच महात्मे सर्व दूर परिचित आहे खंडेरायाचा भंडारा हा ग्रामस्थांसाठी अंतिम शब्दच म्हणावा लागेल.