★बीड येथील मराठा आरक्षणाच्या जाळपोळ प्रकरणातील आरोपींना जामीन मंजूर!
बीड | प्रतिनिधी
मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रामध्ये मराठा योद्धा मनोज जरांगे यांच्या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातील मराठा समाज सहभागी झाला आणि मराठा आरक्षणाची मागणी जोर धरू लागली त्यामध्येच अनेक ठिकाणी जाळपोळ देखील झाली बीड येथे मोठ्या प्रमाणावर जाळपोळ झाली होती यामध्ये अनेक निर्दोष मराठा युवकांना गोवण्यात आले होते परंतु त्यांच्या मदतीला बीड येथील वकील टीम धावून आली त्यामध्ये ॲड.शशिकांत सावंत यांच्यासह त्यांच्या टीमने एकही रुपया न घेता मराठा युवकांना जामीन मंजूर करण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले आणि अखेर त्यांना जामीन मंजूर करून घेतला.
बीड येथील जाळपोळ प्रकरणी मराठा युवकांना अटक करण्यात आली होती त्यांना बीड येथील ॲड.शशिकांत सावंत यांच्यासह त्यांच्या टीमने योग्य पद्धतीने मांडणी करत युवकांना जामीन मंजूर करून घेतला. ॲड.शशिकांत सावंत यांच्यासह बीड येथील मराठा युवकांच्या मदतीला धावणाऱ्या सर्व वकील मंडळीचे सकल मराठा समाजाकडून जाहीर आभार व्यक्त केले आहेत.