★महंत स्वामी जनार्धन महाराज यांचे मार्गदर्शनाखाली मुर्तीप्राणप्रतिष्ठा सोहळा!
★श्रीक्षेत्र नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज यांचे काल्याचे
शिरूर कासार | जीवन कदम
श्रीक्षेत्र संस्थान मच्छिंद्रगड येथे मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलश रोहन सोहळा मठाधिपती महंत जनार्दन महाराज यांच्या मार्गदर्शना खाली आयोजित करण्यात आले होता.त्याची सांगता रविवार ( ता.१७ ) रोजी श्री क्षेत्र संस्थान नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज यांच्या काल्याच्या किर्तणा ने हजारो भाविक भक्तगणाच्या उपस्थित सांगता झाली.
मच्छिंद्रगडावर मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहोळा बुधवार ( ता.१३ ) रोजी वेदशास्त्रसंपन्न महेश महाराज जोशी मातोरीकर व ब्रम्हवृंदाच्या मंञ घोषात कार्यक्रम प्रारंभ झाला होता.गडावर पाच दिवशीय कार्यक्रमा नंतर मुर्ती ची भव्यदिव्य शोभा याञा वाजत गाजत काढून मच्छिंद्रगडावर भव्यदिव्य मंदीरात श्री रुक्मिणी पांडुरंग, श्री नर्मदेश्वर नंदी, गणपती, श्री संत गोरोबा काका, श्री संत धोंडीराम महाराज, श्री संत महादेव महाराज नारायण गडकर, श्री संत सेवालाल महाराज यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलश रोहन सोहळा मच्छिंद्रगडाचे महंत जनार्दन महाराज, नारायनगड चे महंत शिवाजी महाराज यांचा शुभ हस्ते पार पडला.त्या नंतर महंत शिवाजी महाराज यांच्या काल्याच्या किर्तणाने सांगता झाली या वेळेस ब्रम्हनाथ संस्थान चे मठाधिपती रामेश्वर महाराज, उद्धव महाराज नारायनवाडीकर, हानुमान महाराज शास्ञी आळंदी, एकनाथ महाराज पठाडे राक्षसभुवन, नवनाथ महाराज भालगाव, महादेव महाराज घुंगरड, नासिकेत महाराज, पञकार चंद्रकांत राजहंस, डिगांबर गायकवाड, जालिंदर ननवरे, गोरख खेडकर, सह गायनाचार्य, मृदंगाचार्य उपस्थित होते.महाप्रसादाने सांगता झाली. या वेळेस निगमानंद विद्यालयाचे शिक्षक कर्मचारीवर्ग विधार्थीनी महाप्रसाद वाटप नियोजन केले तर मच्छिंद्रगड परीसरातील भाविक भक्तगण मोठ्या प्रमाणावर उपस्थित लावली होत या कार्यक्रमात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
★गडावर पाचवी ते बारावी पर्यत शिक्षणाची सोय!
क्षेत्र संस्थान मच्छिंद्रगडाचे संस्थापक अध्यक्ष ब्रम्हलीन संत निगमानंद महाराज यांनी गडाची उभारणी करून धार्मिक कार्यबरोबर ज्ञान दाणाची गंगा परीसरातील भाविक भक्तगणाच्या सेवेत उपलब्ध करून दिली गडावर भव्यदिव्य स्वरूपात मंदीर उभारण्यात आले त्या मधे मच्छिंद्रनाथाच्या मंदीरात विविध संत महात्म्य देवाच्या मूर्तीची स्थापना करून भक्तांना सर्व देवांचे दर्शन होईल आसी सोय केली.गडावर पाचवी ते बारावी पर्यत शिक्षणाची सोय करून गोरगरीब वंचित घटकातील विधार्थी शिक्षण घेत आहेत.