शरीर जरी साथ देत नसले तरी निश्चयापासून हटणार नाही – जरांगे पाटील
★मराठा योद्धा मनोज जरांगे यांचे धारूर येथील सभेत आव्हान
किल्ले धारूर | प्रतिनिधी
शरीर साथ देत नसल तरी निश्चयापासून हटणार नाही. सत्तर वर्षे अन्याय आणी गोळ्या ही आम्हालाच हा कसला न्याय.फक्त आरक्षण मिळेपर्यत संयम बाळगा पुन्हा यांचाही हिशोब करणारच असल्याचा विश्वास मनोज जरांगे यांनी येथील बाजार समीतीच्या प्रांगणात झालेल्या सभेत केला. सभेच्या वेळी जरांगे यांना अशक्त पणा वाटू लागल्याने अर्ध्यातून खुर्चीवर बसून भाषण केले. सभा संपताच डॉक्टरांनी मंचावरच त्यांची तपासणी केली.
धारूर येथे बाजार समितीच्या मैदाणावर सभेत मराठा योद्धा मनोज जरांगे बोलत होते. दुपारी पावणे चार वाजण्याच्या दरम्यान सभा सुरू झाली आणि सव्वा चार वाजता सभा संपली. सभेसाठी धारूर, वडवणी, केज येथून मराठा महीला पुरुष बांधवांनी हजेरी लावली होती. पुढे बोलतांना मनोज जरांगे म्हणाले की,आता आरक्षणाची लढाई जिंकायची आहे. त्या साठी एक जुट कायम ठेवायची आहे. आपली मुले खोटे गुन्हे दाखल करून सरकारने गुंतविले. आरक्षण मिळाल्यावर त्याचा हिशोब होईल. कारण नसतांना मुलाना निष्पाप मुलांना का गुतविले हे सरकारला विचारले आहे. गुन्हे मागे होतील यात शंका नाही. आम्ही काहीच केले नसतांनाही आमच्या आया बहिणीच्या डोक्याच्या चिंधड्या केल्या. काही माऊल्यांचे हात मोडले, डोके फोडले आहेत. एवढ्या मोठ्या जातीला न्याय द्यायचा असेल तर थोडे सहन करावे लागलणार आहे. 120 ब सारखे कलमेही आमच्यावर लावले. त्या मावल्या अंतरलीच्या नुसून महाराष्ट्राच्या आहेत. एकदा आरक्षण मिळाले की मग बघू. मराठ्यांची लेकर आरक्षणाची वाट पाहत आहेत. माझं शरिर साथ देत नसतांनाही मि एक इंचही मागे सरकणार नाही. जिव गेला तरी चालेल पण लेकरांना आरक्षण दिल्या शिवाय थांबायचं नाही. तिसरा दिवस तापीचा आहे मि मरायला तयार आहे. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील समाज आरक्षणासाठी मैदाणात उतरला आहे. मराठ्यांनी आपल्या लेकरांना सुखात न ठेवता दुसऱ्याचे दुःख जाणले. तेच लोक आरक्षणात आडवे येत आहेत. अशी संधी पुन्हा मिळणार नही. 39 लाख लोकांना आता आरक्षण मिळाले आहे. या मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून अनेकांनी बलीदान दिले त्यांना विसरून चालणार नाही. मराठ्यांनी 80 टक्के लढाई जिंकली आहे. आरक्षणा मुळे 1 टक्क्यावरू हुकले तर अनेकांची नौकरी गेली. शेती आपल्याला साथ देत नाही. आरक्षण नाही तर नौकरी नाही. आरक्षण नसल्याने बाप लेकरांच्या आशेची राख रांगोळी झाली. जातीपेक्षा नेत्याला मोठं माणू नका ते मोठे झाले. ते आज अपल्या साठी उभे नाहीत. जागरूक राहण्याची गरज आहे. काही लोकांनी जाती – जातीत दंगली घडवून धेय विचलीत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आपल्या लेकरांच्या विजयाचा दिवस जवळ आला आहे. एकदा आरक्षण मिळाले की मग बघू. त्यांना माहीत नाही की आमच्या पण हातात दंडूके आहेत.
वय झालं तर त्याला कळणा गेल असही छगन भुजबळ यांना इशारा देण्यात आला. आरक्षणा साठी सरकार कायदा पारित करणार आहे. कायदा परित करण्यासाठी 24 डिसेंपर्यंत पर्यंत थांबायचं आहे. मग आरक्षण मिळणार आहे. एकजूट फूटू देवू नका. मला शत्रू मानायला लागले तरी मी भित नाही. ओबीसी आणि मराठा बांधव लहान मोठ्या बांध वाप्रमाणे आहेत. त्याच्यासाठी दंगली होवू द्यायच्या नाहीत. मी लढतांना मरायला भित नाही. अगोदर समाज मग कुंटूंब अस माझ आहे. तुमच्या बळावर मी लढतोय. माझा जिव जरी गेला तरी मी एक इंच तरी मागे हटणार नाही असा शब्द देतो असेही जरांगे म्हणाले. अवघ्या तीस मिनीटाच्या भाषनात तालुक्यातील घराघरातील मराठा एक करुन संघटीत करण्याचे आवाहन श्री जरांगे पाटील यांनी केले. यावेळी सर्वत्र तरुण आणि डोक्यावर भगव्या टोप्या घालून एक मराठा लाख मराठा असा संदेश देण्यात आला होता.
★जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
सरकार एकट्या छगन भुजबळचे ऐकून आमच्यावर अन्याय करणार असतील तर सरकारलाही मराठे जड लावल्याशिवाय गप बसणार नाही . सरकारच्या मनातला गैरसमज जात नाही . मराठा समाज लेकराच्या हितासाठी तुम्हालाही पायाखाली तुडवू शकतो. असा ईशाराही सरकारला दिला.
★एकची सभा प्रकृती अस्वास्थाने दुपारी तीन चाळीसला सुरु
धारूर येथील शिवाजी चौकात २१ जेसीबीनी फुलांची उधळण करुन स्वागत करण्यात आले. एक तास शहरतून रॅली काढण्यात आली. सभेसाठी आलेल्यांना मुस्लिम समाजाच्या वतीने तसेच आर्यवैश्य कोमटी, मारवाडी समाजाच्या वतीने नाष्टा, पाण्याची सोय करण्यात आली होती.
★सुरेश शेळके यांच्या बॅनरने सर्वांनाच केले आकर्षित!
मराठा आरक्षणाच्या लढाईमध्ये मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील ज्या पद्धतीने काम करतायेत आणि त्यांच्यासोबत खंबीरपणे पहिल्या दिवसापासून सावलीसारखे सोबत असणारे किशोर आप्पा पिंगळे यांची साथ असल्याने त्यांना देखील तितकच मराठा समाजाने डोक्यावर घेतलेलं दिसत आहे. धारूर येथे सुरेश शेळके यांनी मराठा योद्धा मनोज जरांगे व किशोर पिंगळे यांचे लावलेले बॅनर सर्वांनाच आकर्षित करत होते.