उच्च न्यायालयाचे ॲड.वसंतराव सोळुंके यांच्या टीमचं कुसळंब ग्रामस्थांकडून आभार
★ सर्व वकील टीमचे कुसळंब ग्रामस्थांकडून जाहीर आभार
पाटोदा | सचिन पवार
पाटोदा तालुक्यातील कुसळंब गाव हे नेहमीच मराठा आरक्षणासाठी आघाडीवर राहिली आहे, मग त्या ठिकाणी आंदोलन असो सामाजिक सलोखा असो किंवा आर्थिक उलाढाल असो सर्वच ठिकाणी कुसळंब गाव मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पुढे राहिले आहे.
अंतरवाली सराटी येथे झालेल्या विराट सभेसाठी कुसळंब गावातून 60 गाड्यांचा ताफा गाव बंद करून महासभेसाठी पोहोचला होता. गावामध्ये सरकारच्या निषेधार्थ अंत्ययात्रा काढून मराठा आरक्षणाचा मुद्दा किती गंभीर आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला होता. ग्रामपंचायत निवडणुकीवर सुद्धा बहिष्कार टाकून आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वात अगोदर सहभाग नोंदवला होता अशा विविध कारणाने कुसळंबगाव मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वात पुढे राहिले आहे. तसेच या आरक्षणाच्या या प्रक्रियेमध्ये जाळपोळ झाल्याची घटना घडली होती त्यामध्ये कुसळंब येथील सात आरोपींना अटक करण्यात आली होती. अटक झालेल्या सर्वांना गावाच्या एक रुपयाचा गावाच्या विचाराचा आणि युवकांच्या भविष्याचा विचार करून उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केली असून या सर्व प्रक्रियेमध्ये उच्च न्यायालयाचे वकील ॲड.वसंतराव सोळुंके माजी अध्यक्ष बार कौन्सिलन महाराष्ट्र यांनी काम पाहिले आहे. वकील साहेबांच्या उत्कृष्ट न्यायालयासमोरच्या मांडणीने, हेरिंगने कुसळंब येथील सर्व मराठा युवक जामिनावर बाहेर आले आहेत, त्याबद्दल सर्व कुसळंब ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले आहे.
★ॲड. वसंतराव सोळुंके, ॲड.साबळे, ॲड. पवार यांचे ग्रामस्थांकडून जाहीर आभार
मराठा आरक्षणासाठी कुसळंब येथील युवकांकडून घडलेल्या जाळपोळीच्या घटनेमध्ये अटक करण्यात आलेल्या सात मराठा युवकांना पहिल्या दिवसापासून जामीन मिळेपर्यंत पाटोदा येथील ॲड.विलास पवार, बीड येथील ॲड.साबळे यांनी तर उच्च न्यायालयातील ॲड.वसंतराव सोळुंके यांनी योग्य पद्धतीने मांडणी करत युवकांना जामीन मंजूर करून दिल्याबद्दल कुसळंब ग्रामस्थांच्या वतीने जाहीर आभार व्यक्त केले आहेत.