★सकल मराठा मदत फाउंडेशनचा अखंड माणुसकीचा झरा!
पाटोदा | सचिन पवार
पाटोदा तालुक्यामध्ये मराठा समाजाच्या हक्कासाठी मराठा चळवळ अगदी खंबीरपणे सुरू आहे मग मग आंदोलन असेल सहकार्याची भावना असेल मदतीचा कार्य असेल सर्वात पुढे पाटोदा तालुका आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आपली जीवन यात्रा संपवणाऱ्या नायगाव येथील गोविंद आवटे यांच्या कुटुंबीयांना पाटोदा येथील सकल मराठा मदत ग्रुपच्या वतीने आधार देण्यात आला असून त्यांना लोकसहभागातून 17000 रुपयाची आर्थिक मदत पोहोच करण्यात आली आहे.
मराठा चळवळीत काम करणारे सकल मराठा मदत ग्रुपचे सुरेंद्र तिपटे व सहकार्यांनी मयत गोविंद आवटे यांच्या पत्नी राधाबाई यांच्या खात्यावर ही रक्कम जमा केली आहे व त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना आधार देखील दिला असून भविष्यात तुमच्या कुटुंबीयांच्या पाठीशी सकल मराठा समाज खंबीरपणे उभा आहे असं सुद्धा आश्वासन दिले आहे. सराटी अंतरवर या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी म्हणून जरांगे पाटील यांचे नेतृत्वाखाली आंदोलन सुरू झाल्यानंतर पाटोदा तालुक्यातील वेगवेगळ्या गावांमध्ये आक्रमक रित्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले यामध्ये नायगाव येथील गोविंद आवटे यांनी दोन महिन्यापूर्वी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आपली जीवन यात्रा संपवली यामुळे परिसरात हळूहळू देखील व्यक्त करण्यात आली परंतु त्यांच्या कुटुंबीयांना आधाराची गरज असल्याने सकल मराठा मदत ग्रुपच्या वतीने त्यांना माणुसकी बरोबर आर्थिक मदतीचा आधार सुद्धा देण्यात आला आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून समाज बांधवांना आव्हान केल्यानंतर मदतीचा ओक सुरू झाला आणि शासन आणि देखील त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत केली त्याच पद्धतीने राजकीय नेत्यांनी सुद्धा मदतीचा हातभार लावला आहे सकल मराठा ग्रुपच्या वतीने 17000 रुपयाची मदत त्यांच्या कुटुंबीयांना सुपूर्त करण्यात आली येणाऱ्या काळात सुद्धा त्यांच्या पाठीशी सकल मराठा समाज खंबीरपणे उभा राहील असे देखील सांगण्यात आले आहे.
★मराठा आरक्षणासाठी आत्महत्या नव्हे लढाई गरजेची – सुरेंद्र तिपटे
मराठा आरक्षणाची लढाई आता आत्महत्या करून जिंकायची नावे तर आपल्याला संघर्ष करून संविधानिक पद्धतीने आपल्याला आपल्या हक्काचे आरक्षण मिळवून घ्यायचा आहे त्यामुळे आत्महत्या कोणीही करू नये आणि आपल्या आरक्षणाच्या लढाई मराठा योग्य मनोज जरांगे यांच्या पाठीशी खंबीर उभे राहून त्यांना बळ देण्याचे काम आपण करावं एवढीच विनंती आहे.
– सुरेंद्र तिपटे
मराठा सेवक पाटोदा तालुका.