नियत वयोमानानुसार आज बीड येथे सेवापूर्ती गौरव समारंभ
-प्रा.बिबीशन चाटे
महाराष्ट्र ही संतांची आणि वीरांची भूमी आहे. संत श्रेष्ठ तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ महाराज, गोरोबाकाका, सावता माळी, आदी संत महंतांसह हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी राजे, महाराणी ताराबाई, मा जिजाऊ साहेब, अहिल्यादेवी यासारख्या शूर वीरांची भूमी आहे. समाजसेवेचा वारसा घेऊन समाज सेवेबरोबरच ऐक्य बंधुत्व सर्वधर्म समभाव आदी मूल्यांची जोपासना करण्यात स्त्रियांचाही महत्त्वाचा वाटा राहिला आहे. आजही प्रशासनामध्ये महिला अत्यंत सक्षमपणे आपले कर्तव्य निभावत राष्ट्रसेवा करताना दिसत आहेत.आपले कौटुंबिक कर्तव्य पार पाडत मुळातच समाजसेवेची आवड असल्यामुळे आणि अध्यात्माची गोडी असल्याने प्रशासनामध्ये आणि विशेषतः महिला आणि बालकल्याण विभागांमध्ये पर्यवेक्षक म्हणून काम करणाऱ्या सौ.जयश्री साहेबराव बेद्रे पाटील (करांडे) यांचे कार्य नोंद घेण्यासारखे आहे. आज त्यांचा प्रदीर्घ सेवेनंतर मान्यवरांच्या उपस्थितीत बीड येथे सेवापुर्ती गौरव समारंभ संपन्न होत आहे.सौ जयश्रीताई साहेबराव बेंद्रे पाटील करांडे यांनी महिला व बालकल्याण विभागामध्ये पर्यवेक्षक पदावर जिल्हा परिषद बीड येथे गेल्या 29 वर्षापासून अत्यंत प्रामाणिकपणे निष्ठेने आणि तितक्याच यशस्वीरित्या सेवा केली आहे. त्याबद्दल त्यांना सेवा गौरव समारंभ 30 नोव्हेंबर 2023 रोजी त्या नियत वयोमानानुसार निवृत्त झाल्या. या अनुषंगाने त्यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ आज बीड येथे संपन्न होत आहे. पती श्रीयुत साहेबराव भाऊराव बेंद्रे पाटील हे माजी सरपंच असून त्यांना दोन अत्यंत कर्तव्यदक्ष मुले आहेत. रुपेश साहेबराव बेंद्रे पाटील हे राजकारण समाजकारण तसेच व्यवसायामध्ये अत्यंत यशस्वीपणे पुढे येत आहेत; तर दुसरे पुत्र निलेश साहेबराव बेंद्रे पाटील उच्चशिक्षित असून यांचा सुद्धा व्यवसाय आहे.मार्च 1994 साली अंगणवाडी पर्यवेक्षक पदावर सौ.जयश्री ताईंची निवड झाली. त्या रुजू झाल्यानंतर अत्यंत कार्यक्षमपणे त्यांनी सेवा केली. प्रथमतः बीड तालुक्यातील पाली विभागात त्यांनी तब्बल अकरा वर्षे सेवा केली. नंतर पाटोदा येथील नायगाव पाटोदा वैद्यकीय या तीनही विभागात दहा वर्षे सेवा केली. शिरूर कासार तालुक्यामध्ये साडेतीन वर्ष सेवा केल्यानंतर 2019 ते 2023 या कालावधीत त्यांनी सेवा करून कार्यपूर्ती केली.त्यांच्या कारकिर्दीत त्यांच्या विशेष कार्याची दखल घेत त्यांना अनेक वेळा सन्मानित करण्यात आले. अनेक पुरस्कारही लाभले.तत्कालिन महिला व बालकल्याण मंत्री माननीय पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते मुंबई येथे पोषण अभियान मध्ये उत्कृष्टरित्या काम करून शिरूर कासार तालुक्यात महाराष्ट्रात तृतीय क्रमांक मिळाल्याबद्दल जयश्री ताईंना पुरस्कार देऊन त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा गौरव करण्यात आला होता.तर एप्रिल 2023 मध्ये महाराष्ट्राच्या महिला व बालकल्याण विभागाच्या आयुक्त नोबल मॅडम तसेच बीडच्या जिल्हाधिकारी सौ.दीपा मुधोळ- मुंडे तसेच जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार साहेब आणि बीडचे पोलीस अधीक्षक ठाकूर साहेब यांच्या हस्ते आदर्श पर्यवेक्षिका पुरस्कार प्रदान करून त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.एकूणच सामाजिक धार्मिक वैचारिक सांस्कृतिक शैक्षणिक प्रशासकीय अध्यात्मिक अशा विविध क्षेत्रांमध्ये प्रमाणिकपणे कर्तव्य बजावून शासनाचे निर्णय जनतेपर्यंत पोहोचून त्यांना सेवा देण्याचे कर्तव्य त्यांनी अखंडपणे केले आहे. तीन दशकानंतर त्या मी येतो वयोमानानुसार निवृत्त होत आहेत. महिला व बालकल्याण विभागाच्या विविध अधिकारी कर्मचाऱ्यांसह राजकीय सामाजिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या भविष्यातील आनंदी प्रगतिशील आणि यशस्वी जीवनासाठी ईश्वराकडे प्रार्थना करत शुभेच्छा दिल्या आहेत.
★’आदर्श पर्यवेक्षिका’ पुरस्काराने सन्मान!
श्रीमती जयश्री साहेबराव बेदरे पाटील करांडे यांनी आपल्या तीन दशकाच्या कारकिर्दीत प्रशासनाशी अत्यंत सलोखा ठेवत आणि प्रामाणिकपणे सेवा दिली. ग्रामीण भागातील महिला भगिनींना त्यांनी शासनाच्या आदेशानुसार सेवा दिली. या सर्व कार्याची दखल घेत शासनाच्या वतीने 2022- 23 मध्ये उत्कृष्ट पर्यवेक्षिका म्हणून मान्यवरांच्या हस्ते झालेला सन्मान इतर महिला कर्मचाऱ्यांना प्रेरणा देणारा ठरला आहे. प्रशासनातील महिला भगिनी म्हणून त्यांचा परिवर्तनवादी काळात अभिमान आहे.