बिबट्याचे लाईव्ह प्रक्षेपण परिसरात भीतीचे वातावरण
★विभागाने गांभीर्याने दखल घ्यावी सौताडा परिसरातील ग्रामस्थांची मागणी
पाटोदा | सचिन पवार
बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध सौताडा धबधबा आणि प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी हजारो भाविक भक्त येत आहेत. जामखेड इथून असेच एक कुटुंब दर्शनासाठी कारमधून गुरुवारी दुपारी चार वाजता सौताडा येथे आले होते अचानक त्यांना पांडव वस्ती समोरील एका नदीच्या वळणाजवळ आल्यानंतर पुढे काही अंतरावर अचानक गर्द झाडीतून एक बिबट्या समोर येतात सर्व कुटुंब घाबरले होते. कुटुंबीयांनी बिबट्याचा प्रत्यक्ष पाहिलेला थरारक हा अंगावर शहारे येणारा होता. अशी प्रतिक्रिया त्या कुटुंबीयांनी लोकवास्तवशी बोलताना दिली.
पाटोदा तालुक्यातील सौताडा श्रीक्षेत्र रामेश्वर दरीत गुरुवारी सायंकाळी पाच वाजता सुमारास जामखेड येथील काही पर्यटक कार मधून येत होते सायंकाळी पाचच्या समारं जामखेड रस्त्यावरील मुख्य घाटात खालच्या छोट्या रस्त्याने पांडवस्ती मार्गे ते रामेश्वर दरीकडे जात असताना अचानक गर्द झाडीतून बिबट्या कार च्या समोर आला तेव्हा कार चालवत असलेले ड्रायव्हर यांनी अचानक कारला ब्रेक लावतो तोपर्यंत कुटुंबीयांनी कारच्या काचा बंद केल्या समोर असलेली कार पाहून बिबट्या गुरगुरत होता तेव्हा त्या कुटुंबीयांनी बिबट्या झाडीत जात असल्याचे ठराव चित्रित केल. गाडीच्या हॉर्नचा आवाजाने बिबट्या क्षणात गायब झाला आणि गाडीतील सर्वांनीच सुटकेचा श्वास घेतला परिसरातील नागरिकांनी सुद्धा सतर्क रहावे असे आवाहन करण्यात येत आहे.
★परिसरातील शेतकऱ्यांनी पर्यटकांनी काळजी घ्यावी
सौताडा परिसरात बिबट्या दिसल्याची माहिती मिळतात आम्ही रामेश्वर परिसरात पथक पाठवले पथकाने पाहणी केली असता बिबट्याचे ठसे आढळून आले आहेत आजूबाजूच्या शेतकरी व ग्रामस्थांनी काळजी घेण्याची गरज असून रात्री अपरात्री शेतात जाणे टाळावे जवळ काडेपेटी किंवा कंदील ठेवा शक्य असल्यास वाजणाऱ्या वस्तूच जवळ ठेवाव्यात बॅटरी लाईट पेक्षा वन्यप्राणी आगीच्या जवळ येत नाही त्यामुळे शेकोटी चा वापर करावा अशी आव्हान वनपरिक्षेत्राधिकारी एस एस काळे यांनी केले आहे.