पाटोदा येथे प्रसाशकीय इमारती साठी 23 कोटी 95 लक्ष तर महसूल कर्मचारी निवास्थानसाठी 14 कोटी 38 लक्ष निधी
★पाटोदा तालुक्याच्या वैभवात भर टाकणारा निधी
पाटोदा | सचिन पवार
पाटोदा येथील महसूल कर्मचारी निवास्थान बाबत अनेक वर्षा पासून विषय पेंडिंग होता अखेर या इमारत बांधकामासाठी 14 कोटी 38 लक्ष निधी तसेच आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या तालुका स्थरीय बैठकीत प्रशासकीय इमारत बांधकाम करण्याची मागणी करण्यात आली अनेक कार्यालयाला इमारती नसल्याने अडचणी निर्माण होत होत्या प्रशाकीय इमारतीस आमदार बाळासाहेब आजबे काका यांनी सुमारे 23 कोटी 95 लक्ष निधी खेचून आणला असल्याने तालुक्यात नवचेतन्य निर्माण झाले आहे सदरील इमारती मुळे पाटोदा शहराच्या विकासात भर पाडणार असून शहराचे वैभवात भर पडणार असल्याने काकांनी आष्टी बरोबर पाटोदा तालुक्याच्या विकासाकडे लक्ष केंद्रित केल्याने जनतेत उत्साहाचे वातावरण आहे.आ.बाळासाहेब आजबे हे विकास पुरुष आहेत अशी चर्चा तालुक्यातील जनतेत होत आहे. बांधकामासाठी आमदार बाळासाहेब आजबे काकांनी 38 कोटी 33 लक्ष निधी आणल्याचे तालुका अध्यक्ष दिपक घुमरे यांनी माहिती दिली आहे.
★पाटोद्याच्या वैभवात भर टाकणारा निधी
आष्टी मतदार संघाचे आमदार बाळासाहेब आजबे काका यांनी पाटोदा तालुक्याच्या वैभव भर टाकण्यासाठी कोट्यावधीचा निधी मंजूर करून आणला आहे. पाटोदा तालुक्यातील प्रशासकीय इमारती महसूल कर्मचारी निवासस्थान इत्यादीसाठी 38 कोटी 33 लाख रुपये चा निधी खेचून आणला आहे त्याबद्दल पाटोदा तालुक्याच्या वतीने आमदार साहेबांचे जाहीर आभार व्यक्त केले आहेत.