16.6 C
New York
Thursday, October 16, 2025

Buy now

spot_img
spot_img

शेतकऱ्यांचे नेते गणेश कवडे पुन्हा शेतकऱ्यांसाठी आक्रमक!

शेतकऱ्यांचं अन् गणेश कवडे यांचं नातं आपुलकीचा आणि हक्काचं!

★शेतकऱ्यांना तात्काळ मंजूर 25 टक्के मंजूर आग्रमी विमा द्यावा – गणेश कवडे

पाटोदा | सचिन पवार

पाटोदा तालुका हा नेहमीच दुष्काळाच्या क्षेत्र खाली राहिला आहे खरीप हंगामाच्या सोयाबीन पेरणीनंतर 21 दिवस पाटोदा तालुक्यामध्ये पावसाचा खंड पडल्याने प्रशासनाकडून तात्काळ शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करून शहानिशा केली आणि त्यानुसार 25% आग्रमी विमा मंजूर केला पाटोदा तालुक्यातील काही मंडळात शेतकऱ्यांना सहा हजार चारशे शहात्तर रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे विमा खात्यावर जमा देखील झाला आहे पण पाटोदा तालुक्यातील एकाही शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा रक्कम अद्याप जमा न झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शेतकरी नेते गणेश कवडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी बांधवांनी पाटोदा तहसील यांना निवेदनाद्वारे मंजूर झालेला सोयाबीनचा 25% आग्रही विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी केली आहे.
पाटोदा तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नेहमीच शेतकरी नेते गणेश कवडे आक्रमक होऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम केलं आहे येणाऱ्या काळात देखील शेतकऱ्यांना कसलीच अडचणी येणार नाही हा ठाम विश्वास शेतकऱ्यांना गणेश कवडे यांनी दिल्याने शेतकरी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहताना दिसत आहेत प्रशासनाकडून शेतकऱ्यांना खरीप हंगामातील सोयाबीनच्या पिकासाठी प्रशासनाकडून 25 टक्के अग्रणी विमा मंजूर झाला परंतु तो अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर न जमा झाल्यामुळे शेतकरी नेते गणेश कवडे यांनी तहसीलवर मोर्चा काढून तहसीलदारांना जाब विचारत शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ मंजूर विमा देण्यात यावा अशी मागणी केली आहे यावेळी शेतकरी नेते गणेश कवडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष शिवभूषण जाधव, वहाब भाई, योगेश ढवळे, देविदास काळे, दादासाहेब घुमरे, आबासाहेब भोसले, अण्णासाहेब राऊत, बाळासाहेब जावळे, बाळासाहेब गर्जे, शंकर बामदळे सुभाष बामदळे, लहू नागरगोजे, राहुल नागरगोजे, विठ्ठल नाईकवाडे, रवींद्र घुमरे, बाबासाहेब घुमरे, विठ्ठल गाडेकर, संतोष घाडगे, भाऊसाहेब सानप, देविदास वीर, भीमराव घोलप, अंकुश गुंड, बापू नाईकनवरे, धनराज घुमरे, आनंद अवसरमल यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

★शेतकऱ्यांना गणेश कवडे यांच्याकडूनच न्याय मिळण्याची अपेक्षा!

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नेहमीच शेतकरी नेते गणेश कवडे यांनी आवाज उठवला आहे त्यामुळे आता देखील शेतकऱ्यांना गणेश कवडेच आपल्याला न्याय देऊ शकतात या आशेने त्यांच्याकडे प्रश्न घेऊन येतात आणि त्यांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देखील मिळत त्यामुळे शेतकरी गणेश कवडे यांच्यावर समाधानी असून पुढील काळात देखील त्यांच्याकडूनच न्याय मिळू शकतो या अशाने पाहत आहेत. गणेश कवडे देखील शेतकऱ्यांना निराश न होऊ देता त्यांचं काम चोखपणे पार पाडतात यामुळे शेतकरी वर्गात त्यांच्याबद्दलची अधिक आपुलकी आणि प्रेम निर्माण झालेलं पाहायला मिळत आहे.

★शेतकऱ्यांचे प्रश्न माझ्या हातून सुटतात हे माझे भाग्य – गणेश कवडे

पाटोदा तालुक्यातील शेतकरी बांधव त्यांचा कोणताही प्रश्न असला की नक्कीच माझ्याकडे धावून येतात त्यांचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याचा माझा प्रयत्न असतो आणि त्याच हेतून त्यांचं काम देखील मी पूर्ण प्रामाणिकपणे करतो आणि त्यांचे प्रश्न देखील सोडवतो आणि ते सुटतात देखील त्यामुळे शेतकरी मोठ्या आशेने माझ्याकडे त्यांचं काम घेऊन येतात हे माझं भाग्य आणि त्यांचं काम माझ्या हातून होतं हे देखील माझे भाग्यच येणाऱ्या काळात देखील शेतकऱ्यांना कसलीही अडचण आल्यास त्या ठिकाणी खंबीरपणे उभा राहील..
– शेतकरी नेते गणेश कवडे

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!