मराठ्यांना आरक्षण घेणार आणि तेही ओबीसीमधूनच घेणार मनोज जरांगे पाटील
★9 किमीसाठी 3 तास चालली दुचाकी रॅली ; रॅली मार्गावर सोळा ठिकाणी सत्कार
★दोन दिवसांत सर्व गुन्हे मागे घ्या, अन्यथा गाठ मराठ्यांशी ; जालन्याच्या सभेत जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
जालना | सचिन पवार
जालना शहरातील छत्रपती संभाजी उद्यान ते शनिमंदिर व अंबड रोडवर रॅलीत सहभागी झाल्यानंतर दुचाकीच्या लांबपर्यंत अशा प्रकारे रांगा लागल्या होत्या. या रॅलीत हजारो दुचाकी सहभागी झाल्या होत्या. तसेच या भव्यदिव्य रॅलीमुळे शुक्रवारी संपूर्ण शहर भगवेमय झाले होते.
जालना शहरातील छत्रपती संभाजी उद्यान ते शनिमंदिर व अंबड रोडवर रॅलीत सहभागी झाल्यानंतर दुचाकीच्या लांबपर्यंत अशा प्रकारे रांगा लागल्या होत्या. या रॅलीत हजारो दुचाकी सहभागी झाल्या होत्या. तसेच या भव्यदिव्य रॅलीमुळे शुक्रवारी संपूर्ण शहर भगवेमय झाले होते. 19 जेसीबीद्वारे शहरात ठिकठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्यावर करण्यात आली पुष्पवृष्टी, जोरदार घोषणाबाजीने दणाणले शहर आंतरवाली सराटी पासूनच मनोज जरांगे यांचा जागोजागी सत्कार झाल्यामुळे जालन्यातील छत्रपती संभाजी उद्यानात ते दुपारी २ वाजून २८ मिनिटाने पोहोचले. जरांगे सनरुफमधून हात जोडून उभे राहताच एकच जल्लोष सुरू झाला. पोलिस व समन्वयकांनी रांगेने उभे राहून त्यांना पुतळ्यांपर्यंत जाण्यासाठी जागा करून दिली. पुष्पहार अर्पण करताच टाळ्यांचा कडकडाट झाला. यानंतर मोठमोठ्याने घोषणाबाजीसह फटाके फोडून सात जेसीबीतून पुष्पवृष्टी झाली. यानंतर दुचाकी रॅलीचे मार्गक्रमण सुरू झाले. रॅली मार्गावर जागोजागी रांगोळी काढण्यात येऊन जागोजागी सत्कार झाले. सभास्थळापर्यंतचे वीस मिनिटांत गाठता येणारे नऊ किलोमीटरचे अंतरातील ही रॅली तब्बल सव्वातीन तास सुरू होती.आंतरवालीत १७ डिसेंबरला ठरवणार पुढची रणनीती सरसकट मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांची शुक्रवारी जालन्यात विराट सभा झाली. या वेळी त्यांनी राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्यासह सरकारचा कडक शब्दात समाचार घेतला. ‘सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार आंतरवली सराटीसह राज्यभरातील सर्व मराठा आंदोलकांवरील गुन्हे दोन दिवसांत मागे घ्या. तसेच २४ डिसेंबरपर्यंत विनाअट आरक्षण द्यावे अन्यथा गाठ मराठ्यांशी आहे’, असा इशारा त्यांनी दिला. दरम्यान, सरकारने दिलेल्या मुदतीत आरक्षण न दिल्यास १७ डिसेंबर रोजी आंतरवालीत बैठक घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल,’ असेही त्यांनी जाहीर केले.
★पंधरा ठिकाणच्या हायटायझरवरून रॅलीवर लक्ष ठेवत होते पोलीस
शहरातून दुचाकी रॅली जात असताना नियंत्रण ठेवण्यासाठी रॅलीच्या नऊ किलोमीटर अंतरात 15 ठिकाणी हायटायझर उभारण्यात आले होते यावर पोलीस थांबून रॅलीतील हालचाली टिपत होते वाहतूक खोळंबू नये म्हणून पोलिसांनी दुचाकीच्या एका मागे एक अशा तीन रांगा केल्या होत्या.
★रॅलीत या ठिकाणी मनोज जरांगे यांचा झाला सत्कार
जालना शहरातील छत्रपती संभाजी उद्यान, शनी मंदिर, गांधी चमन, मंमादेवी, पाणीवेस, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, मामा चौक, सुभाष चौक, स्व. रामभाऊ राऊत पुतळा, भोकरदन नाका या ठिकाणी मनोज जरांगे यांचा सत्कार करण्यात आला गांधी चमन येथे शेख इब्राहिम मित्र मंडळ यांच्यासह मुस्लिम बांधवांनी सत्कार केला भोकरदन नाक्याजवळ जय भीम सेनेचे सुधाकर निकाळजे यांच्या वतीने सत्कार केला आरक्षण मिळण्यासाठी जय भीम सेनेच्या वतीने पाठिंबा दिला आहे तसेच अंबरीश शोरूम च्या वतीने मस्तगड येथे बिस्कीटचे वाटप करण्यात आले होते.
★या मार्गावरून गेली दुचाकी रॅली
छत्रपती संभाजी महाराज पुतळा, शनि मंदिर, गांधी चमन, मुथा बिल्डिंग, पाणीवेस, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, मामा चौक, सुभाष चौक, स्व. रामभाऊ पुतळा, भोकरदन नाका मार्गे सभास्थळी पोहोचली.