मराठा चळवळ आणि सामाजिक कार्याची दखल घेत खासदारांची तिपटे कुटुंबीयांना भेट!
★पाटोदा तालुक्यात खासदार प्रीतम ताई मुंडे यांनी दिल्या अनेकांच्या घरी भेटी
पाटोदा | सचिन पवार
पाटोदा तालुक्यामध्ये अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात आणि मराठा चळवळीमध्ये अग्रस्थानी राहून काम करणारे मराठा सेवक सुरेंद्र तिपटे यांच्या निस्वार्थी सामाजिक कार्याची दखल घेत बीड जिल्ह्याच्या खासदार प्रीतम ताई मुंडे यांनी पाटोदा येथे तिपटे कुटुंबीयांची भेट घेऊन कार्याचं कौतुक केले.
बीड जिल्ह्याच्या खासदार प्रीतम ताई मुंडे या पाटोदा तालुक्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या. पाटोदा तालुक्यामध्ये अपंग व्यक्तींना आवश्यक त्या वस्तू वाटपाचा कार्यक्रम होता यानिमित्त पाटोदा तालुक्यातील अनेकांच्या घरी खासदार साहेबांनी भेट देऊन त्यांच्या त्यांच्या कार्याचे कौतुक केले. पाटोदा तालुक्यातील मराठा चळवळीच्या व सामाजिक कार्यात नेहमीच अग्रस्थानी असणारे सुरेंद्र तिपटे यांच्या घरी सदिच्छा भेट देत त्यांच्या कार्याचे कौतुक केले व भविष्यात तुमच्या कार्याला खासदार या नात्याने शासकीय मदत मिळून देण्यासाठी सर्व तोपर्यंत प्रयत्न करेन आणि ती मिळून देण्यासाठी मी खंबीरपणे आपल्या सोबत असल्याच्या भावना देखील व्यक्त केल्या. यावेळी मराठा सेवक सुरेंद्र तिपटे यांच्या कुटुंबीयांनी खासदार प्रीतम मुंडे यांचा सत्कार जिजाऊ मासाहेबांचा फोटो भेट देऊन स्वागत केले.
★मराठा मदत फाउंडेशनच्या कामाला शुभेच्छा
खासदार प्रीतम मुंडे यांच्याकडून पाटोदा तालुक्यातील मराठा मदत फाउंडेशनच्या कामाला शुभेच्छा देत शासन स्तरावर शक्य होईल सहकार्य सुद्धा आमच्याकडून मिळत राहील व खासदार या नात्याने खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभी आहे असा आशावाद व्यक्त केला आणि कार्याला शुभेच्छा देखील दिल्या.
★अतिथी देवभव या नात्याने खासदार साहेबांचा स्वागत
आपल्या घरी येणारा प्रत्येक अतिधी हा देव भव्य नात्याने असतो त्या नात्यानेच बीड जिल्ह्याच्या खासदार प्रीतम ताई मुंडे यांनी माझ्या कार्याची दखल घेऊन आमच्या घरी सदिच्छा भेट दिली त्यांचं अतिथी या नात्याने आमच्या कुटुंबीयांनी स्वागत केलं आणि आम्हाला दिलेल्या शुभेच्छांचा मनःपूर्वक स्वीकार करून त्यांचे आभारही व्यक्त करत आहोत..
– मराठासेवक सुरेंद्र तिपटे