12.9 C
New York
Tuesday, April 1, 2025

Buy now

spot_img
spot_img

ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांनी घेतले श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे दर्शन!

★ॲड.बाळासाहेब आंबेडकर आणि महंत विठ्ठल महाराज यांची तीन तास बंद दाराआड चर्चा!

कुसळंब | सचिन पवार

वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर आणि श्रीक्षेत्र गहीनाथ गडाचे महंत विठ्ठल महाराज यांच्यात आज दुपारी गुरुवारी तब्बल तीन तास बंद दाराआड चर्चा झाली. दरम्यान, संत वामन भाऊंच्या समाधीचे नतमस्तक होऊन दर्शन घेतल्यानंतर बाळासाहेब आंबेडकर यांनी गडाच्या वतीने स्नेहभोजनही स्वीकारले.अचानक झालेल्या या प्रदीर्घ भेटीची चर्चा मात्र यावेळी या परिसरात चर्चेचा विषय ठरली. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून राज्यभर संघर्ष करणारे बाळासाहेब आंबेडकर आज दुपारी निवांत दिसले. त्यांनी अचानक बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यातील श्रीक्षेत्र गहीनाथ गडावर दुपारच्या वेळी महन्त विठ्ठल महाराज यांच्याशी बंद दाराआड मुक्त संवाद साधला. दरम्यान, कोणत्या विषयावर चर्चा झाली या संदर्भात अधिकृत माहिती प्राप्त झाली नसली तरी राजकीय सामाजिक धार्मिक विषयावर चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. एक वर्षावर लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आल्या आहेत. राजकीय नेते राज्यभराच्या वेगवेगळ्या भागात कार्यकर्त्यांशी चर्चा आणि संवाद साधत आहेत. आज गुरुवारी बाळासाहेब आंबेडकर यांनी अचानक संत वामनभाऊ महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत हा गड राज्य आणि देशभराच्या धार्मिक नकाशावर आहे. लाखो भक्त येथे पुण्यतिथीला येतात. पुण्यतिथी जानेवारी महिन्यात असल्याने बाळासाहेब आंबेडकर यांना आमंत्रणही दिले जाऊ शकते अशी चर्चा यावेळी दिसून आली.एकूणच, बाळासाहेब आंबेडकर आणि महंत विठ्ठल महाराज यांच्यामध्ये तब्बल दोन तासाहून अधिक बंदरात चर्चेत कोणते विषय हाताळले गेले? यासंदर्भात तालुका आणि जिल्हा भर चर्चेला उधाण आले आहे. यावेळी त्यांच्यासमवेत वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा.किसन चव्हाण सर,तक्रार निवारण समितीचे राज्य अध्यक्ष प्रा. विष्णू जाधव सर, जिल्हाध्यक्ष उद्धव खाडे ,तालुका अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, सचिन मेघ डंबर ,शामसुंदर वाघमारे, सुभाष सोनवणे, राहुल सोनवणे. विविध पदाधिकारी उपस्थित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!