आरोग्यमंत्री डॉ.सावंत यांनी टाकलेली जबाबदारी बीडचे भूमिपुत्र डॉ.राधाकिसन पवार यांनी खंबीरपणे सांभाळली
★आरोग्याची वारी पंढरीच्या दारी शिबिरात सव्वा लाख भक्तांवर उपचार!
बीड | सचिन पवार
पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक भक्त कार्तिकी वारी निमित्त पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला येतात बीड जिल्ह्यातील माजलगाव चे 76 वर्षाचे विशंभर वाघमारे हे वारकरी गेले होते परंतु अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले त्यांना तात्काळ आरोग्य पथकाने बाजूला नेत उपचार केले इंजेक्शन व औषध उपचार करून त्यांना जीवनदान दिले वाघमारे यांच्या प्रामाणिक श्रद्धेमुळेच त्यांच्या मदतीला पांडुरंग धावून आला. आरोग्याची वारी पंढरीच्या दारी या शिबिरात तब्बल सव्वा लाख भाविकांवर उपचार करण्यात आले आहेत.
पांडुरंगाच्या दर्शनाला कार्तिकी एक वारीनिमित्त 22 ते 24 नोव्हेंबर दरम्यान पंढरपूर मध्ये आरोग्यमंत्री प्रा डॉ तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून आरोग्य विभागाने तीन दिवसीय महाआरोग्य शिबिर घेतले. यात वारकऱ्यांना विविध रोगांवर मोफत उपचार व आरोग्य सेवा पुरवण्यात आली यासाठी डॉक्टर तज्ञ तंत्रज्ञ परिचारिका व कर्मचारी स्वयंसेवक यांच्यासह सुमारे 3000 मनुष्यबळाचे नियोजन केले होते रुग्णांच्या सुविधांसाठी 108 क्रमांकाच्या सात रुग्णवाहिका सज्ज होत्या तसेच नेत्रविकार, हृदयविकार, किडनी, पोटाचे विकार, त्वचेचे विकार, मधुमेह, हाडाची तपासणी, इसीजी व सोनोग्राफी तपासणी रक्त तपासणी, उच्च रक्तदा,ब त्वचारोग, दंतरोग, संसर्गजन्य रोग, कुष्ठरोग, कॅन्सर यासारख्या रोगांवर उपचार करून चष्म्याचे ही वाटप केले. आरोग्याची यंत्रणा सक्षम राहिल्यानेच विविध जिल्ह्यातून आलेल्या सव्वा लाख वारकऱ्यांना सेवा तात्काळ मिळाली त्यातीलच एक माजलगावची वाघमारे ही वारकरी आहे. विशेष म्हणजे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून आरोग्याची वारी पंढरीच्या दारी या शिबिराची जबाबदारी पूर्णपणे बीड जिल्ह्याची भूमिपुत्र डॉ.राधाकिसन पवार यांच्यावर सोपवली होती ती त्यांनी जबाबदारी पूर्णपणे स्वतःच्या खांद्यावर घेत योग्य पद्धतीने पार पाडली आहे.
★बीड जिल्ह्याच्या भूमिपुत्राच उत्कृष्ट नियोजन
बीडचे भूमिपुत्र डॉ.राधाकिसन पवार हे सध्या पुण्याची उपसंचालक आहेत पंढरपूर आषाढी एकादशीच्या निमित्ताने घेतलेल्या शिबिराची जबाबदारी ही आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी डॉ.राधाकिसन पवार यांच्यावर सोपवली होती. यावेळीही शिबिरामध्ये लाखो भक्तांवर उपचार केले होते ते शिबिर यशस्वी झाल्यानंतर आता या शिबिराचे नियोजनही डॉ.पवार यांच्याकडून करण्यात आले. यामध्ये सव्वा लाख वारकऱ्यांची सेवा करण्यात आली आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर यशस्वी पार पडले.
★वारकऱ्यांच्या सेवेचे भाग्य मला मिळालं
नवरात्र उत्सवात तुळजापूर तर आषाढी एकादशी कार्तिकी वारी निमित्त भाविक पंढरपूरला येतात यात काही वृद्धही असतात त्यांच्यासह इतरांच्या आरोग्याची समस्या लक्षात घेऊन आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी तीन दिवसीय शिबिर घेण्याची नियोजन केले त्यांची संकल्पना यशस्वी झाली आहे या सेवेसाठी मलाही सहभागी होता आले हे माझे भाग्य समजतो..
– डॉ.आर.बी.पवार
उपसंचालक, पुणे.