विमा भरावा तरी कसा? जिल्ह्यातील हजारो शेतकरी वंचीत राहण्याची शक्यता
★रब्बी हंगामासाठी विमा भारण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी
पाटोदा | सचिन पवार
राज्यातील शेतकऱ्यांना पिक विमा भरण्यासाठी पहिल्यांदाच राज्य सरकारने जबाबदारी घेतली. सरकारच्या या योजनेतून एक रुपयांमध्ये शेतकऱ्यांना आपल्या शेतातील उभ्या पिकाचा विमा उतरवता येणार आहे. मात्र, रब्बी हंगामात पिक विमा भरण्यासाठी सरकारची वेबसाईट योग्यप्रकारे चालत नसल्याने शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पीक विमा भरण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतकरी सीएससी सेंटरवर पिक विमा भरण्यासाठी चकरा मारत आहेत. मात्र, पीक विमा भरण्यासाठीची वेबसाईट चालत नसल्याने त्यांना दिवसभर सीएससी सेंटरवरच बसून राहाव लागतं आहे.
पिक विमा वेबसाईट सतत हँग होत आहे. एक रुपयात पिक विमा भरून घेत जात असल्याने सर्वच शेतकरी पिक विमा भरण्यासाठी पुढाकार घेत आहेत. त्यामुळे, सर्वच सीएससी सेंटरवर शेतकरी पिक विमा भरण्यासाठी गर्दी करत असले तरी, दुसरीकडे मात्र पीक विमा भरण्यासाठीची वेबसाईट सतत हँग होत असल्याने शेतकऱ्यांना दिवस-दिवस सीएससी सेंटरवर बसून राहावं लागत आहे. पिक विमा भरण्यासाठी ज्वारी ची ३० नोव्हेंबर शेवटची तारीख असून या तारखेच्या आत शेतकऱ्यांना ज्वारी या पिक विमा भरावा लागणार आहे. त्यानंतर १५ डिसेंबर पर्यंत गहू, कांदा, हरभरा या पिकाचा वीमा भरता येणार आहे.
★कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे मुदतवाढीची मागणी
बीड जिल्ह्यातीलच कृषिमंत्री असलेल्या धनंजय मुंडे यांनी तात्काळ या प्रकरणात विशेष लक्ष देऊन पिक विमा भरण्यासाठी वेबसाईट सुरळीत करून पीक विमा भरण्यासाठी मुदत वाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
★पिक विमा वेबसाईट चालत नसल्याने हजारो शेतकरी संभ्रमित
बीड जिल्ह्यामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी एक रुपयांमध्ये पिक विमा भरत आहेत. मात्र पीक विमा भरण्यासाठीची वेबसाईट चालत नसल्याने पिकाचं नुकसान झाल्यानंतर मदत कशी मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
★पिक विमा काढण्यासाठी सीएससी सेंटरवर शेतकऱ्यांच्या चकरा
शेतकरी पिक विमा भरण्यासाठी रोज सीएससी सेंटरच्या चकरा मारत आहेत. राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी लक्ष घालावे अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
★पिक विमा शेतकऱ्यांचा एकमेव आधार
दुष्काळ परिस्थितीमध्ये हवामानाचा फटका शेतीला बसलाच तर, पिक विमा एकमेव आधार शेतकऱ्यांना असतो आणि त्यामुळेच विना अडथळा तो पिक विमा शेतकऱ्यांना मिळावा हीच अपेक्षा.