आ.निलेश लंके पंधरा दिवसात दुसऱ्यांदा जामखेड दौऱ्यावर !
★प्रा.लक्ष्मण ढेपे यांच्या निवासस्थानी दिवाळी फराळ निमित्त सदिच्छा भेट!
जामखेड | सचिन पवार
महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वसामान्य घरातून विधानसभेच्या राजभवनात जाणारा आरोग्य दूत आमदार म्हणून निलेश लंके यांची ओळख आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमदार निलेश लंके यांची लोकप्रियता तुफान निर्माण निर्माण झाल्याने पक्षाकडून त्यांच्यावर अधिक मोठी जबाबदारी लोकसभेच्या निमित्ताने येऊ शकते असे संकेत सध्या आमदार निलेश लंके यांच्या जामखेड दौऱ्यावरून दिसत आहेत. सर्वसामान्य जनतेसोबत आपुलकीची नाळ जोडल्याने पक्षाला सुद्धा मोठा फायदा होत आहे त्याचबरोबर सर्वसामान्य जनतेचे प्रश्न अगदी सहज सुटत आहेत. आमदार निलेश लंके यांची जामखेड येथील दुसरी चक्कर नक्कीच राजकीय नेत्यांना गोंधळात पाडण्यासारखी आहे. प्रा.लक्ष्मण ढेपे यांच्या निवासस्थानी दिवाळी फराळ च्या निमित्ताने आमदार निलेश लंके यांची उपस्थिती सर्वांनाच विचार करायला लावणारी आहे.
प्रा.लक्ष्मण ढेपे यांच्या निवासस्थानी दिवाळी फराळाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आरोग्य दूध निलेश लंके यांची विशेष उपस्थिती होती यावेळी डॉ.भगवान दादा मुरुमकर, प्रा मधुकर आबा राळेभात, मा अजहरभाई काझी,खलील मौलाना,जमीर बारूद,प्रा.जाकिर शेख सर,राहुल उगले,जनता टेलर्स,पवनराजे राळेभात,शामिर सय्यद,भरत जगदाळे, उमरभाई कुरेसी,मोहन पवार, मयूर भोसले,संतोष भाऊ घव्हाळे,राणा सदाफुले,आशिफ शेख,मंजुर भाई, कल्लुचाचा, शेरखान भाई, नागनाथ मुरुमकर, भैया पठान,भैया तांबोळी, इम्रान कुरेशी,वसीम मंडप,रुषी मीटके,संतोष वारे,(ZP सदस्य करमाळा)विक्की घायतडक सर,प्रितम घायतडक,पुरुषोत्तम घायवळ,राजेंद्र गोरे,इस्माईल सय्यद, रुषीकेश नेटके,फिरोज बागवान,आज्युशेठ काझी, संदीप गायकवाड, सज्जाद पठान व पत्रकार बंधु व विविध मान्यवर उपस्थित होते तसेच सर्व जामखेड तालुक्यातील आलेल्या मान्यवरांकडून आ.निलेशजी लंके यांना पुढील राजकीय प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या..
★प्रा.लक्ष्मण ढेपे यांचे कुटुंब सामाजिक कार्यात वाहून घेणारे
राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये प्रा.लक्ष्मण ढेपे यांनी स्वतःबरोबर कुटुंब काम करताना पाहिले आहे. सर्वसामान्य जनतेची नाळ जोडत त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होऊन त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना पाहत आहोत येणाऱ्या काळात त्यांच्यावर सुद्धा समाजाची मोठी जबाबदारी पडू शकते असे संकेत आमदार निलेश लंके यांनी दिले आहेत.
★राजकारण व समाजकारणातून जनतेची सेवा हेच ध्येय – प्रा.लक्ष्मण ढेपे
आम्ही अनेक वर्षापासून राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखामध्ये सहभागी होऊन त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आलो आहोत येणाऱ्या काळात देखील करत राहू अशा भावना प्रा.लक्ष्मण ढेपे यांनी व्यक्त केल्या.
★सर्व धर्मीयातील एकोपा जपण्याचा प्रयत्न – अंजलीताई ढेपे
मारोळी ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकास कामाच्या माध्यमातून विविध धार्मिक सणाच्या माध्यमातून हिंदू-मुस्लीम सह सर्व धर्मीयांना सोबत घेऊन आज पर्यंत आम्ही काम करत आलो आहोत येणाऱ्या काळात देखील सर्व धर्मीयांना सोबत घेऊन विविध विकासकाम असतील किंवा धार्मिक काम असतील ते करत राहो आणि एकोपा जपण्याचं आणि एकोप्याचा संदेश देण्याचे काम करत राहू अशा भावना मारोळी गावच्या सरपंच अंजलीताई लक्ष्मण ढेपे यांनी व्यक्त केले आहेत.