6.3 C
New York
Tuesday, April 1, 2025

Buy now

spot_img
spot_img

त्या तिन्ही मराठ्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून दहा लाखाची मदत सुपूर्त!

पाटोदा तालुक्यातील त्या तिन्ही मराठ्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून प्रत्येकी दहा लाख व आ.धस यांच्याकडून पन्नास हजाराची मदत!

★मराठासेवक सुरेंद्र तिपटे यांच्या पुढाकाराने तिन्ही कुटुंबांची संजय गांधी निराधार योजनेत फाईल मंजूर!

मराठ्यांनो आत्महत्याचा विचार सोडा ; आरक्षण टप्प्यात आलयं! 

पाटोदा | सचिन पवार

मराठा आरक्षणाचा मुद्दा हा अनेक वर्षापासून रेंगाळत पडला आहे. अनेकांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलने उपोषणे केली परंतु शासनाने दखल न घेतल्यामुळे अनेक मराठा युवकांनी आत्महत्या देखील केले आहे. अनेकांना शासनाकडून मदत देखील मिळाली आहे. पाटोदा तालुक्यातील पाचंग्री येथील सुभाष भानुदास मुंडे, नायगाव येथील गोविंद गोपीचंद औटे, पांढरवाडी येथील बाळू भानुदास पाचपुते या तिन्ही कुटुंबीयांना शासनाकडून 10 लाख रुपयांची मदत मिळाली असून आमदार सुरेश धस यांनी देखील प्रत्येकी कुटुंबीयांना 50 हजार रुपये देऊन समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडले आहे परंतु आत्महत्या करणे हा शेवटचा पर्याय नसून आता कोणीही आत्महत्या करू नये आरक्षण टप्प्यात आल आहे. आरक्षण सर्वांनाच मिळणार आहे, त्यामुळे स्वतःचा जीव धोक्यात घालू नये एवढीच विनंती सकल मराठा समाजाकडून करण्यात येत आहे.
पाटोदा तालुक्यातील पाचंग्री येथील सुभाष भानुदास मुंडे, नायगाव येथील गोविंद गोपीचंद औटे, पांढरवाडी येथील बाळू भानुदास पाचपुते या तिन्ही कुटुंबीयांना शासनाकडून 10 लाख रुपयांची मदत मिळाली ही मदत पाटोदा तहसील येथे एसडीएम प्रमोद कुदळे साहेब तसेच तहसीलदार चितळे साहेब यांच्या हस्ते देण्यात आली कुटुंबीयांना दिलेला हा शासनाकडून चा आर्थिक आधार खूप मौल्यवान आहे, त्याबद्दल मराठ्यांचा क्रांतीसुर्य मनोज जरांगे पाटील तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री धनंजय मुंडे, जिल्हाधिकारी दीपाताई मुधोळ, आमदार सुरेश धस, आमदार बाळासाहेब आजबे, एसडीएम प्रमोद कुदळे, तहसीलदार चितळे साहेब यांचे सकल मराठा समाजाकडून आभार व्यक्त केले आहे. शासनाकडून मिळालेली ही मदत अति मौल्यवान आहे परंतु आता आरक्षणाचा मुद्दा निकाली निघत आहे त्यामुळे कोणीही आत्महत्या करून स्वतःचं कुटुंब उघड्यावर पाडू नये हे देखील विनंती व आव्हान सकल मराठा समाज पाटोदा तालुक्याच्या वतीने करण्यात आले आहे.

★आ.सुरेश धस यांच्याकडून तिन्ही कुटुंबीयांना पन्नास हजाराची मदत पोहोच!

पाटोदा तालुक्यातील मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या मराठा तरुणांच्या कुटुंबीयांना आमदार सुरेश आण्णा धस यांच्याकडून 50 हजाराची मदत पोहोच केली आहे. पाचंग्री येथील सुभाष भानुदास मुंडे , नायगाव येथील गोविंद गोपीचंद आवटे, पांढरवाडी येथील बाळू भानुदास पाचपुते या तीनही कुटुंबीयांना आमदार सुरेश आण्णा धस यांच्याकडून प्रत्येकी 50 हजार रुपये देऊन मराठा समाजा प्रति असलेले कर्तव्य पार पाडले आहे.

★शहीद मराठा युवकांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी सकल मराठा समाज उभा – सुरेंद्र तिपटे

पाटोदा तालुक्यातील मराठा आरक्षणासाठी काही युवकांनी बलिदान दिले आहे त्यांना शासनाकडून मदत मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न केले आहेत, ती मदत मिळाली देखील आहे तसेच त्यांच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत फायली देखील मंजूर केल्या आहेत तसेच सकल मराठा समाज तुमच्या पाठीशी खंबीर उभा आहे परंतु आता कोणीही आरक्षणासाठी आपली जीवाची बाजी लावू नये आत्महत्या करू नये एवढीच विनंती आहे.
– सुरेंद्र बाबा तिपटे
मराठासेवक पाटोदा.

★आरक्षण टप्प्यात आले ; आत्महत्या करू नये!

मराठा आरक्षणाचा मुद्दा लवकरच निकाली निघणार आहे. सर्व मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळणार आहे, त्यामुळे आत्महत्या करून आपले कुटुंब उघड्यावर पाडू नये आरक्षण टप्प्यात आले आहे, फक्त आत्महत्या कोणी करू नये असे आव्हान सकल मराठा समाज पाटोदा तालुक्याच्या वतीने करण्यात आले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!