6 C
New York
Tuesday, April 1, 2025

Buy now

spot_img
spot_img

लांबरवाडीत दिवसाढवळ्या चोऱ्या, चाकू हल्ल्याने नागरिक भयभीत!

पाच सहा महिन्यापासून चोरांची लांबरवाडीवर वक्रदृष्टी !

★पोलिसांच्या नजरेआड ग्रामस्थांच्या नजरेसमोर चोरांची घरफोडी सुरू

★चाकूंचा धाख दाखवत वार करून दिवसा ढवळ्या घरफोडीचे सत्र सुरच!

कुसळंब | सचिन पवार

पाटोदा तालुक्यातील लांबरवाडी येथे गेल्या सहा सात महिन्यापासून घरफोडी चोरीचे सत्र जोरदार सुरू आहे. पोलिसांच्या नजरेआड तर ग्रामस्थांना चाकूचा धाक दाखवत दिवसाढवळ्या घरफोडी केल्याची तिसरी घटना आहे. सात महिन्यापूर्वी लांबरवाडी येथील तलावावरच्या सहा सात विद्युत मोटारी चोरून नेल्या होत्या तर तीन महिन्यापूर्वी दोन घरांची घरफोडी करून सोनं व पैसे चोरून लंपस केले होते तसेच दिवाळीच्या अगोदर आठ दिवस घरफोडी करण्याचा प्रयत्न केला परंतु तो डाव फसला आणि आता काल सोमवार दिनांक 21 रोजी दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी संभाजी बाबासाहेब लांबरूड यांच्या घरातून तीस हजार रोख रक्कम व 22 ग्रॅम सोनं चोरून नेले तसेच त्या चोरट्यांचा मोर्चा टोकडवस्ती मधील माजी सरपंच बाबासाहेब एकनाथ लांबरुड यांच्या घरी घुसून कुलूप तोडून घरातील सव्वाचार तोळे सोनं घेऊन जात असताना तेवढ्यात बाबासाहेब लांबरुड शेतातून घरी आले असता त्यांना तीन लोक समोर दिसले असता त्यांनी त्यांना विचारले आणि त्यांना चोरीचा संशय येतात आरडाओरडा करण्या अगोदर त्या चोरांनी त्यांना हातावर चाकूचा वार करत तिथून पळ काढला. तिथून ते सुप्पा, घुलेवाडी, सौताडा, भुतवडा या मार्गे त्यांनी पळ काढला अशी माहिती लांबरवाडी येथील ग्रामस्थांनी दिली आहे.

★अंमळनेर पोलीस सतर्क!

अंमळनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास सुरू आहे. अंमळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी हे स्वतः तपास करत आहे, काही पुरावे हाती लागली असून लवकरच शहानिशा करून आरोपी अटक करू अशी माहिती गोसावी साहेब यांनी दिली आहे.

★दिवसाढवळ्या चोरी व चाकू हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीच वातावरण

गेल्या सहा-सात महिन्यापासून लांबरवाडी येथे अनेक चोऱ्या झाल्या आहेत आता तर चाकू हल्ला झाला आहे. नागरिकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झाले असून पोलीस प्रशासनाने अधिक सतर्कतेने तपास करून अशा चोरांना वेळी चाप देण्यात यावा आणि नागरिकांना या भयभीत वातावरणातून मुक्त करावे एवढीच अपेक्षा आहे.
– अंकुश आबा लांबरूड
माजी सरपंच लांबरवाडी.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!