★आ.सुरेश धस, महंत राधाताई महाराज, ह.भ.प.रंधवे बापू महाराज, ह.भ.प.सतीश महाराज यांची प्रमुख उपस्थिती
पाटोदा | सचिन पवार
पाटोदा नगरपंचायत चे नगराध्यक्ष राजू भैय्या जाधव यांची मुलगी मृण्मयी हीचा प्रथम वाढदिवस व दिवाळी निमित्त स्नेहभोजन कार्यक्रम पाटोदा येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी लोकनेते मा.आ.सुरेश (अण्णा) धस, ह.भ.प वैराग्यमूर्ती रामकृष्ण रंधवे बापु, महाराज, ह.भ.प.राधाताई महाराज, ह.भ.प सतीश (बाबा) महाराज यांनी उपस्थित राहुन शुभ आशीर्वाद दिले.नगराध्यक्ष राजुभैय्या जाधव यांनी पाटोदा शहराच्या व तालुक्यातील सर्वांगीण विकासासाठी मोलाचे योगदान दिले आहे.पाटोदा तालुक्याला राजुभैय्याच्या निमित्ताने तरूण नगराध्यक्ष लाभला आहे त्याच्या हातुन पाटोदा शहराचा व तालुक्याचा चेहरामोहरा बदलावा अशी आपेक्षा आनेकांनी व्यक्त केली. दिवाळी निमित्त स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केल्या बद्दल सर्वच मान्यवरांनी राजुभैय्याचे कौतुक केले. कार्यक्रमास विविध पक्षाचे पदाधिकारी, जिल्हा भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष, व मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे गट, उद्योजक, जिल्हाध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य नगराध्यक्ष, गटनेते, सभापती, नगरसेवक महिला, विविध गावचे सरपंच, युवक व्यापारी, डॉक्टर, शिक्षक, मुख्याध्यापक, विविध खात्यांचे कर्मचारी शेतकरी, सर्व नातेवाईक व मित्रपरिवार आणि जाधव कुटुंबीयांवर प्रेम करणारे सर्वच क्षेत्रातील मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.शेवटी सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. त्यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचे नगराध्यक्ष राजू भैया जाधव यांच्या परिवाराकडून आभार व्यक्त करण्यात आले.
★राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांकडून खूप प्रेम मिळाले – राजू जाधव
राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्रामध्ये काम करत असताना प्रामाणिकपणे काम करत राहिल्याने सर्व क्षेत्रातील मान्यवरांकडून खूप प्रेम मिळालं आणि मिळत आहे. टिकून ठेवण्यासाठी मी सर्व क्षेत्रांमध्ये प्रामाणिकपणे काम करत आहे आणि करत राहणार आहे. येणाऱ्या काळात माझ्या हातून नक्कीच चांगलं काम होईल आणि करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहील आपले सर्वांचे प्रेम असंच मिळत राहो एवढीच अपेक्षा!
– राजूभैय्या जाधव
नगराध्यक्ष पाटोदा नगरपंचायत.