★दिवाळी फराळच्या कार्यक्रमात काकांचा गोडवा पाहायला मिळाला – संजय पवार
पाटोदा | सचिन पवार
पाटोदा तालुक्यातील तळेपिंपळगाव आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या वतीने कार्यकर्ते व जनतेसाठी दिवाळी फराळाचे आयोजन करण्यात आले होते. दिवाळी फराळाचे निमित्त जरी असले तरी कार्यकर्ते जनतेमधील गोडवा टिकून ठेवण्यासाठीचा हा कार्यक्रम होता म्हटलं तरी चालेल कारण की आमदार साहेबांनी दिवाळी फराळाच्या गोडव्याप्रमाणे कार्यकर्ते, सर्वसामान्य जनतेसोबतचा गोडवा टिकून ठेवला आहे.
आमदार बाळासाहेब आजबे काका यांनी आयोजित केलेल्या दिवाळी फराळाच्या कार्यक्रमासाठी अठ्ठेगाव पुठ्ठ्यातून कार्यकर्त्यांची नागरिकांची विशेष उपस्थिती पाहायला मिळाली. लवकरच अनेकांचे प्रवेश सुद्धा काकांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि आमदार बाळासाहेब आजबे यांच्यावर विश्वास ठेवून अनेक कार्यकर्ते प्रवेश करणार असल्याचं माहिती मिळाली आहे. या दिवाळी फराळ च्या कार्यक्रमांमध्ये अनेक गोड बातम्या सुद्धा जनतेला वाचण्यास मिळाले आहेत. निमित्त फक्त दिवाळी फराळ जे होते परंतु कार्यकर्त्यांच्या अडचणी जनतेचे प्रश्न सोडवण्यावर काकांनी विशेष भर दिल्याने दिवाळी फराळ चा गोडवा वाढला आणि त्यांच्या मनातील प्रश्न सुटले असल्याने कार्यकर्त्यांचा सुद्धा आनंद गगनाला मावला आहे. या दिवाळी फराळसाठी कार्यकर्त्यांनी विशेष उपस्थिती लावली होती यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष संजय पवार, दीपक दादा घुमरे, अंगद भोंडवे, ॲड.विलास पवार, किरण पवार, आबासाहेब पवार, कृष्णा गंडाळ, परसराम पवार, संतोष भालेराव, अंकुश पवार, अमोल गोरे, नामदेव गंडाळ यांच्यासह पाटोदा तालुक्यातील अनेक कार्यकर्ते नेते मंडळी यावेळी उपस्थित होते.
★दिवाळी फराळच्या गोडव्यातून अनेक गोड बातम्या लवकरच!
आमदार बाळासाहेब आजबे काका यांनी आयोजित केलेल्या दिवाळी फराळ चा कार्यक्रमासाठी पाटोदा तालुक्यातील कार्यकर्त्यांनी नेत्यांनी उपस्थिती लावून दिवाळी फराळ गोडव्यासोबत अनेक गोड बातम्या मिळाल्या आहेत येणाऱ्या काळात सर्व गोड बातम्या सर्वांच्या हिताच्या असतील यात शंका नाही. येणाऱ्या काळात पक्ष वाढीसाठी आणि काकांचे हात बळकट करण्यासाठी अमळनेर सर्कलमध्ये अनेक महत्त्वाच्या घटना घडणार आहेत अशी माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष संजय पवार यांनी दिली आहे.