दिवाळी फराळच्या निमित्ताने कार्यकर्त्यांच्या भेटी व जनतेच्या प्रश्नावर महत्त्वाची चर्चा!
★कार्यकर्त्यांचे, जनतेचे तोंड दिवाळी फराळातून गोड आणि कामातून देखील गोड!
[ येतो काका का स्टाईल है! ]
★मराठा कुणबी नोंदी संदर्भात पत्रकारांनी आमदार साहेबांचे लक्ष वेधले!
पाटोदा | सचिन पवार
आष्टी मतदार संघाचे आमदार बाळासाहेब आजबे काका यांनी रविवार दिनांक 19 रोजी सकाळी दहा ते दुपारी तीन पर्यंत पाटोदा तालुक्यातील सर्व कार्यकर्ते व नागरिकांसाठी नगर – बीड हायवेवर तळे पिंपळगाव येथे दिवाळी फराळ आयोजन केलं होत याप्रसंगी आमदार साहेबानी कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी जनतेशी संवाद साधला दिवाळी फराळचे निमित्त पण जनतेचे प्रश्न देखील तितकेच महत्त्वाचे लक्षात घेत जनेतेच्या प्रश्नावर विशेष लक्ष केंद्रित केले आणि जनतेला अडीअडचणी येणार नाहीत यासाठी तात्काळ प्रश्न निकाली लावण्याचा संकल्पच त्यांनी केला. पाटोदा तालुक्यातील आलेले सर्व कार्यकर्ते व सर्वसामान्य जनतेचे दिवाळी फराळच्या निमित्ताने सर्वांचे तोंड गोड केले असून त्याचबरोबर मन देखील काकांच्या शब्दांनी गोड झालेले पाहायला मिळाले. या प्रसंगी आमदार बाळासाहेब आजबे काका, सहकार महर्षी रामकृष्ण बांगर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दिपक दादा घुमरे, अण्णासाहेब लवांडे पाटील, अंगद भोंडवे, युवक अध्यक्ष युवराज झुनगुरे, डॉ प्रभाकर कवठेकर, बेदरवाडी सरपंच काकडे, सरपंच संतोष झुनगुरे पाटील, उपसरपंच हरी काशीद, सरपंच भाऊसाहेब भराटे, डोंगरीचे सरपंच विठ्ल जगताप, नफरवाडी सरपंच बंडू सवासे, सरपंच घोळवे सुभाष, आनंद घुमरे सरपंच, मंगेश पवार , युवराज कोकाटे, शरद पवार, संजय पवार, शरद गवळी, अण्णा टेकाळे, अण्णा शिंदे, सचिन पवार, अशोक लाड, सतीश भवर, अशोक भवर, गोवर्धन सानप, किरण पवार, राजेन्द सकुंडे, संजय घोषिर माउली पाचपुते, बप्पासाहेब जाधव, देविदास गर्जे, मधुकर येवले, अरुण येवले, नामदेव जाधव, गुलाबराव घुमरे, गौतम सरवदे, राजा अण्णा भोसले, प्रशांत गाडे, गोकुळ इंगोले, हरिदास शेलार, बबन पवार, सतीश खोटे, दीपक थोरात आदीसह वकील, डॉक्टर, इंजिनियर, व्यापारी, शेतकरी, कार्यकर्ते, सर्वसामान्य नागरिक, पत्रकार बांधव बहू संख्येने हजर होते.
★काकांकडून दिवाळी फराळचा आणि शब्दांचा गोडवा!
पाटोदा तालुक्यातील कार्यकर्ते जनतेसाठी आष्टी मतदार संघाचे आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्याकडून दिवाळी फराळचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमांमध्ये पाटोदा तालुक्यातील कार्यकर्ते, डॉक्टर, इंजिनियर, वकील, व्यापारी, शेतकरी, पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आमदार काकांकडून दिवाळी फराळच्या गोडव्याबरोबर शब्दाचा गोडवा देखील तितकाच पाहायला मिळाला.
★निमित्त दिवाळी फराळाचे पण सर्व लक्ष जनतेच्या प्रश्नावर!
आष्टी मतदारसंघाची जबाबदारी जेव्हा आमदार बाळासाहेब आजबे यांच्या खांद्यावर आली तेव्हापासून त्यांनी जनतेच्या प्रश्नावर विशेष लक्ष केंद्रित केले आणि राहिलेले प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले आहे आज तगायात करत आहेत. सर्वसामान्य जनतेला आमदार काकांपर्यंत पोहोचता येत नसल्याने त्यांनी विशेष कार्यक्रम आयोजित करून सुद्धा जनतेला एकत्रित करून त्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले आहेत त्यातीलच आजचा दिवाळी फराळ चा कार्यक्रम एक आहे तर वाव वाटायला नको कारण की दिवाळी फराळ च्या निमित्ताने जनतेच्या प्रश्नावर विशेष लक्ष देऊन त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी देखील विशेष प्रयत्न करताना काका पाहायला मिळाले. दिवाळीच्या गोडव्याबरोबर शब्दांचा गोडवा काकांनी दिल्याचं पाहायला मिळालं. मी तुमचाच हक्काचा आमदार आहे हे सुद्धा त्यांनी कालच्या कार्यक्रमातून दाखवून दिले आहे.
★मराठा कुणबी नोंदी संदर्भात आमदार आजबेंची सोमवारी तहसीलदाराबरोबर चर्चा!
दिवाळी फराळच्या निमित्ताने पत्रकार बांधवांची सुद्धा विशेष उपस्थिती होती. या दिवाळी फराळाच्या कार्यक्रमांमध्ये पत्रकारांनी आमदार बाळासाहेब आजबे यांच्याशी संवाद साधत मराठा आरक्षणा बाबत चर्चा केली. नागरिकांना सध्या कुणबी नोंदी संदर्भात अडचणी येत असल्याची कल्पना दिली आमदार साहेबांनी तात्काळ सोमवारी तहसीलदार यांच्याशी चर्चा करून तो प्रश्न सुद्धा निकाली काढू आणि काही अडचण आल्यास मला संपर्क करा असं देखील सांगितले.