फडणवीसांनी ओबीसी नेत्यांना कामाला लावले परंतु सर्वसामान्य ओबीसींनी धुडकावले!
[ सर्वसामान्य ओबीसी-मराठा खंबीरपणे मनोज जरांगेंच्या पाठीशी ! ]
★महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता मनोज जरांगेंच्या पाठीशी खंबीरपणे उभी!
★छगन भुजबळ यांना त्यांच्याच ओबीसी नेत्यांनी फसवलं का ?
बीड | सचिन पवार
अंबड येथे ओबीसी नेत्यांनी एल्गार सभेचे आयोजन केले होते. ज्या ओबीसी नेत्यांचे मोठे मोठे फोटो फॅक्स वर लावले होते तेच नेत्यांची अनुपस्थिती राहिल्याने भुजबळ चांगलेच तोंडावर पडले आहेत. ओबीसी नेत्यांमध्ये सुद्धा संघटन करू न शकणारे भुजबळ आज मनोज जरांगेंवर तोंडसुख घेताना दिसत आहेत परंतु त्यांची पूर्णपणे त्यांच्याच समाजाने पोलखोल केले आहे. ओबीसी समाज भुजबळ आणि ओबीसी नेत्यांना स्वीकारला तयार नाही. ज्या पद्धतीने मनोज जरांगे यांनी ओबीसी आणि मराठा समाजात एकजूट दाखवून दिले आहे त्या पद्धतीने ओबीसी नेत्यांना ती दाखवता आली नाही कारण की ओबीसी नेत्यांची भडकाऊ भाषण ऐकून सर्वसामान्य ओबीसी आणि मराठा समाज त्यांच्यासोबत जायला तयार नाही. येणाऱ्या काळात स्वतःला ओबीसी नेते म्हणून घेणाऱ्यांची काय अवस्था होईल हे आपल्याला अंबडच्या सभेवरून दिसून आलंच असेल यातील मात्र शंका नाही. ज्या नेत्यांनी मग ते ओबीसी असतील किंवा मराठा नेते असतील त्यांना सर्वसामान्य ओबीसी आणि मराठा समाज स्वीकाराला अजिबात तयार नाही कारण की आज पर्यंत त्यांची स्वतःची पोळी भाजून घेत समाजाचं वाटूळच केल आहे असं सर्वसामान्य जनतेच्या लक्षात आल्याने आता नेत्यांची काहीच किंमत शिल्लक राहिली नाही हे सुद्धा सिद्ध झाला आहे. सर्वसामान्य जनता अति हुशार झाली आहे त्याला कारण ठरला आहे ते मनोज जरांगे पाटील त्यांनी सर्वसामान्य जनतेला त्यांच्या गावामध्ये जाऊन समजून सांगितलं आहे की ओबीसी आणि मराठा समाजात वाद लावत स्वतःची पोळी भाजून घेणारे हे नेते आता आपले घर उध्वस्त करण्यासाठी निघाले आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवू नका आणि आपण एक मेक सोबत एक दिलाने रहा तुमचं कोणीच काही वाटोळ करू शकत नाही फक्त तुम्ही नेत्यांचा ऐकू नका हा महत्त्वाचा सल्ला म्हणून जरांगे यांनी दिल्याने सर्वसामान्य जनता आज मनोज जरांगेंना डोक्यावर घेत आहे मग त्या ठिकाणी ओबीसी मुस्लिम माळी धनगर मराठा सर्व समाजाने मनोज जरांगे यांना डोक्यावर घेऊन खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या हिताच नेतृत्व स्वीकारला आहे यातील मात्र शंका उरलीच नाही.
★फडणवीसांचा फडतुस डाव फसला!
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फडतूस डाव फसला असल्याचं सोशल मीडियावर बोलले जात आहे. ओबीसी आणि मराठा असा वाद लावण्याचा डाव त्यांनी खेळला खरा परंतु नेते सुद्धा एकवटू शकले नाहीत तर जनता कधी एकवटणार हे आता दिसून आले आहे. ओबीसी नेते एकवटू शकले नाहीत. नेत्यांचे मोठा रे फ्लेक्स लावले होते त्याच नेत्यांची अनुपस्थिती राहिल्याने भुजबळ एकटेच पडले आणि फडतूस डाव करणारे सुद्धा उघडे पडले. सर्वसामान्य मराठा आणि ओबीसी समाज आता खंबीरपणे मनोज जरांगे यांच्या पाठीशी उभा राहिल्याने फडणवीसांची फडतुसगिरी संपुष्टात आली आहे.
★ओबीसी नेत्यांनीच भुजबळ यांची इज्जत घातली का ?
छगन भुजबळ यांनी ओबीसींची वज्रमूठ बांधायचं ठरवलं सर्वांच्या बैठका घेतल्या एकत्रित केले असं दाखवलं गेलं परंतु सभेच्या वेळी ज्याने त्यांचे मोठमोठे फ्लेक्स लावून येणार असल्याचा सांगितलं त्याने त्यांची अनुपस्थिती ही छगन भुजबळ यांची इज्जत घालणारी ठरली आहे. छगन भुजबळ यांची पूर्ण इज्जत घालायचं ठरवलं आहे की काय ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सर्वसामान्य समाजाला तर भुजबळ चांगलेच कळले आहेत आता नेत्यांना सुद्धा कळले की काय असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
★भुजबळ यांनी मनोज जरांगेंचा नादच करू नये बरं…
मराठ्यांचा क्रांतीसुर्य मनोज जरांगे यांनी सर्वसामान्य मराठा आणि सर्वसामान्य ओबीसी समाज एकत्रित करून त्यांच्या न्याय हक्कासाठी लढा उभारला आहे. सर्व राजकीय नेत्यांना बाजूला ठेवत सर्वसामान्यांच्या घरचा हक्क मिळून देण्यासाठी महाराष्ट्रभर दौरे सुरू आहेत प्रत्येक जाती धर्मातील लोक मनोज जरांगेंच्या स्वागताला उभे आहेत. आता तरी महाराष्ट्रातील लाचार नेत्यांनी मनोज जरांगे यांचा नाद करू नये असं सोशल मीडियावर बोलले जात आहे… खास करून छगन भुजबळ सारख्या भ्रष्ट लाचार नेत्यांनी मनोज जरांगे यांच्यावर बोलणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखा आहे असं बोललं जात आहे..