4.3 C
New York
Thursday, April 17, 2025

Buy now

spot_img
spot_img

जिल्हा परिषद आधीच भाऊसाहेब भवर यांना शुभ संकेत ; गावकऱ्यांनी ग्रामपंचायत दिली अण्णांच्या ताब्यात!

मुगगाव अण्णांचं ; आ.सुरेश धस यांच्या वाघाची डरकाळी !

★मुगगाव ग्रामपंचायतवर आमदार सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली भाऊसाहेब भवर यांचे वर्चस्व!

★मुगगाव येथील भुलेश्वर जय जवान जय किसान दहा पैकी सात जागेवर दणदणीत विजयी

पाटोदा | सचिन पवार

पाटोदा तालुक्यातील महत्वाच्या समजली जाणाऱ्या मुगगाव ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये भुलेश्वर जय जवान जय किसान ग्रामविकास पॅनलच्या सरपंचपदी सौ स्मिता रविंद्र केकान यांनी दणदणीत विजय झाला आहे,
तरी गावातील अठरा पगड जाती धर्मातील मतदार बंधुनी सरपंच पदाची माळ सौ. स्मिता केकान यांच्या गळ्यात घातली आहे तरी हे मतदान अतिथटीचे झाले आसुन. गावातल्या जनतेने दहा पैकी सात ह्या जागा भुलेश्वर जय जवान जय किसान यांच्या भरघोस मतांनी विजयी केले आहेत. हा विजय पॅनलच्या सगळ्या जनतेचा आशीर्वाद आहे. आहे ही माळ फक्त सरपंच सौ. स्मिता केकान सर्व सामान्यतुन उभे केलेल्या प्रत्येक वार्डातील सदस्यांना भरघोस मतांनी निवडून दिले आहे. या विजय उमेदवार पारूबााई मच्छिंद्र खोटे, दगडाबाई रघुनाथ भवर, संगीता राजेंद्र भवर, अरुणा अभिमन्यू शिरोळे, सोमीनाथ नवनाथ भवर, सविता प्रकाश भवर उमेदवार हे भरघोस मतांनी विजयी झाले आहे. भुलेश्वर जय जवान जय किसान ग्रामविकास पॅनलने व गावातील अठरा पगड जाती धर्मातील सर्व मतदार राजाने विरोधी पॅनलचा धुव्वा उडवत सरपंच पदासहीत ग्रामपंचायत आपल्या ताब्यात घेतली. त्यांच्या निवडीने गावात ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. गावात मिरवणूक आली कि गावातील प्रत्येक घरा समोर रांगोळी काढून महिलांनी सरपंच स्मिता रविंद्र केकान यांच्या सहीत सर्व उमेदवारांचे औक्षण केले. याप्रसंगी नुतन सरपंच स्मिता रवींद्र केकान म्हणाले की माझ्या गावातील प्रत्येक महिला, पुरुष, तरुण पिढीने मला व माझ्या सर्व सहकाऱ्यांना भरघोस मतांनी निवडुन दिले ते मी विसरणार नाही. गावचा विकास करुन पूर्ण गावाचा चेहरामोहरा बदलून मी दिलेला शब्द ताकदीनिशी पुर्ण करेल.

★आ.सुरेश अण्णा धस यांच्या माध्यमातून गावाचा कायापालट करू – भाऊसाहेब भवर

पाटोदा तालुक्यातील महत्त्वाची असणारी मुगगाव ग्रामपंचायत अनेक वर्षापासून कागदावरच विकास करत आहे परंतु सर्वसामान्य जनतेने आता सुरेश आण्णा धस यांच्यावर विश्वास ठेवून मुगगाव ग्रामपंचायत आमच्या ताब्यात दिले आहे आता गावाचा विकास हा अण्णांच्या मार्गदर्शनाखाली करून जनतेचे सर्व प्रश्न सोडू आणि जनतेला विकासाच्या दिशेने घेऊन जाऊ…
– भाऊसाहेब अण्णा भवर
भाजपा ज्येष्ठ नेते अंमळनेर सर्कल, पाटोदा

★पाच वर्षे फक्त कागदी घोडे नाचवले आता विकास करू – सरपंच सौ. केकान

गेल्या पाच वर्षांमध्ये मुग गावचा विकास व्हायला पाहिजे तो झाल्या नाही फक्त कागदी घोडे नाचवत जनतेची दिशाभूल केली आणि जनतेला विकासापासून दूर ठेवले परंतु आता सुरेश आण्णा धस यांच्या नेतृत्वाखाली व भाऊसाहेब भवर यांच्या मार्गदर्शनाखाली गावाच्या विकासात भर टाकण्याचे काम आम्ही करू.. तसेच महिलांच्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू..
– सौ.सरपंच स्मिता रविंद्र केकान

★आ.सुरेश आण्णा व भाऊसाहेब अण्णांचं नेतृत्व आम्हाला मान्य – सर्वसामान्य जनता

मुगगावच्या सर्वसामान्य जनतेने मुगाव ग्रामपंचायत आमदार सुरेश आण्णा धस व भाऊसाहेब अण्णा भवर यांच्या वर विश्वास ठेवून एक हाती सत्ता दिली आहे. मुगगाव बरोबर अंमळनेर सर्कल मधील जनता सुद्धा म्हणत आहे. आमदार सुरेश आण्णा धस व भाऊसाहेब अण्णा भवर यांचे नेतृत्व आम्हाला मान्य आहे.. ग्रामपंचायत बरोबर जिल्हा परिषद सुद्धा आता अण्णाच्या बाजूनेच राहील यातील मात्र शंका नाही..

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!