★चिंचाळा व राघापुर येथील 127 शालेय मुलांना सह ग्रा.म. अंगणवाडी सेविका यांना फराळ वाटप
आष्टी | सचिन पवार
आष्टी तालुक्यातील चिंचाळा व राघापुर येथील जि.प.परिषदेच्या शालेय मुलांना व ग्रामपंचायत कर्मचारी, आशा सेविका व अंगणवाडी सेविका यांना सरपंच पंडित आण्णा पोकळे यांच्या वतीने फराळाचे वाटप बुधवार दि.08/11/2023 रोज सकाळी 11 वाजता सरपंच पंडित आण्णा पोकळे यांच्या तर्फे करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष भाऊसाहेब घुले यांच्या प्रमुख उपस्थीतीत हा कार्यक्रम पार पडला दिवाळी निमित्त सरपंच पंडित आण्णा पोकळे यांच्या कडून चिंचाळा व राघापुर येथील 127 शालेय मुलांना व ग्रामपंचायत कर्मचारी, आशा सेविका व अंगणवाडी सेविका यांना फराळ वाटप करण्यात आला यावेळी नगरसेवक नाजीम शेख, मुर्शदपूर ग्रामपंचायतीचे सदस्य डॉ संतोष कदम, अक्षय हळपावत, विजुभाऊ मुटकुळे, कृष्णा मिसाळ, योगेश भगत, ग्रा पं सदस्य बाळासाहेब पोकळे, ग्रा पं सदस्य अनिल पोकळे, रोहीदास पोकळे, आत्माराम पोकळ, डॉ गणेश पोकळे, बाबु आप्पा पोकळे, गोवींद पोकळे, कृष्णा पोकळे, आशोक पोकळे, ग्रामसेवक निशा जगताप, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, ग्रामपंचायत कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
★गावाच्या सेवेत आणि विकासात कधीच कमी पडणार नाही – पंडित पोकळे
ग्रामस्थांनी माझ्यावर टाकलेला विश्वास त्याला कधी तळत जाऊ देणार नाही तर गावाच्या सेवेत आणि गावाच्या विकासात कधीच कमी पडणार नाही येणाऱ्या काळात आमदार बाळासाहेब आजबे यांच्या माध्यमातून विकास कामाचे अंकुर आपल्या चिंचाळावर रागापूर ग्रामपंचायत मध्ये पाहायला मिळतील यात तीळ मात्र शंका नाही.
– पंडित अण्णा पोकळे
सरपंच चिंचाळा, राघापूर ग्रुप ग्रामपंचायत.