कृषिमंत्री धनंजय मुंडे आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचा दुष्काळ पुसून टाकणार
★आष्टी मतदार संघाच्या उज्वल भविष्यासाठी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे आमदार आजबे यांचे विशेष प्रयत्न
बीड | प्रतिनिधी
जिल्ह्यातील उर्वरित 52 मंडळाचा दुष्काळ यादीत समावेश झाल्याने आष्टी पाटोदा शिरूर तिन्ही तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला असून कृषी मंत्री ना धनंजय मुंडे यांनी या तिन्ही तालुक्याचा समावेश केल्या बद्दल आमदार बाळासाहेब आजबे यांनी आभार व्यक्त केले आहेत , आमदार बाळासाहेब आजबे काका यांनी कृषी मंत्री ना
धनंजय मुंडे साहेब यांच्याकडे या बाबत वारंवार पाठपुरावा केला होता, बीड जिल्यातील उर्वरित सर्व मंडळाचा समावेश या यादीत ना.धनंजय मुंडे यांनी करण्यासाठी प्रयत्न केल्याने मा मुख्यमंत्री मा उपमुख्यमंत्री यांचे सुद्धा आभार मानले आहेत केले आहेत, आष्टी पाटोदा हे तिन्ही तालुके नेहमी दुष्काळाच्या छायेत असतात म्हणून मोठ मोठ्या जलसिंचन योजना मंजूर करण्यासाटी गेल्या 4 वर्ष्यापासून प्रयत्नशील आहे यात बऱ्याच अंशी यश येत असून उर्वरित विकास कामे लवकर मार्गी लागतील असे आमदार बाळासाहेब आजबे काका यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना भावना व्यक्त केल्या..
★कृषिमंत्री धनंजय मुंडेचं आष्टी मतदारसंघाचा दुष्काळ पुसणार!
बीड जिल्ह्यातील सर्वात दुष्काळग्रस्त मतदार संघ म्हणून आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाकडे पाहिलं जात परंतु आता बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे आता आष्टी मतदार संघाचा दुष्काळ कायमचा पुसणार असल्याचे बोलले जात आहे. आष्टी पाटोदा शिरूर तीनही तालुक्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. अरे काळात आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघ सुजलाम सुफलाम होईल या पद्धतीने काम आमदार बाळासाहेब आजबे काका करत आहेत असं बोललं जात आहे..
★कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह सर्व मंत्रिमंडळाचे जाहीर आभार – आमदार आजबे
आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाला दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना आधार दिला आहे त्याबद्दल महाराष्ट्र राज्याची कृषिमंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्यासह सर्व मंत्रिमंडळाचे जाहीर आभार..
– आ.बाळासाहेब आजबे
आमदार आष्टी मतदारसंघ..