महाविकास आघाडीच्या सत्तांतरानंतर हे काम रद्द करण्याचे पत्र कुणी दिले ?
★खुंटेफळ साठवण तलावाच्या संदर्भात आमदार बाळासाहेब आजबे यांची पत्रकार परिषद संपन्न!
आष्टी | प्रतिनिधी
आष्टी तालुक्यातील खुंटेफळ साठवण तलावासाठी शिम्पोरा ते खुंटेफळ साठवण तलाव या पाईपलाईन कामाच्या निविदेसंबंधी आमदार महोदयांनी दाखवलेले पत्र म्हणजे ” मेहनत करे मुर्गा और अंडा खाये फकीर ” अशी अवस्था आहे,असे प्रतिपादन आ.बाळासाहेब आजबे यांनी केले..
आष्टी येथे संपर्क कार्यालयामधील पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते यावेळी बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.शिवाजी राऊत, माजी जिल्हा परिषद सदस्य सतीश शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी नाकाडे उपस्थित होते.खुंटेफळ साठवण तलावासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या उजनी जलाशयातून शिम्पोरा येथून थेट पाईपलाईन द्वारे पाणी खुंटेफळ साठवण तलावामध्ये सोडण्याच्या योजना कामाच्या निविदेचे पत्र उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते आपण प्राप्त केले आहे अशा आशयाच्या वर्तमानपत्रां मध्ये बातम्य यांनी प्रसिद्ध केल्या आहेत त्यावर प्रतिक्रिया देण्यासाठीच ही पत्रकार परिषद आयोजित केल्याचे त्यांनी सांगत. ते पुढे म्हणाले की, खुंटेफळ साठवण तलावासाठी उजनी जलाशयातून खुंटेफळ साठवण तलावासाठी शेडगाव पेडगाव पासून पाणी बोगद्याद्वारे तीन ठिकाणाहून खुंटेफळ साठवण तलावा मध्ये आणण्या बाबतची अंदाजपत्रके तयार असताना.. आमदार झाल्यानंतर आपण शेतकरी असल्यामुळे बोगद्याद्वारे आणि कालव्याद्वारे संपूर्ण पाणी खुंटेफळ साठवण तलावात येण्याआधी गळती मोठ्या प्रमाणावर होऊ शकेल हे लक्षात आल्यानंतर लगेचच बोगदा आणि कालव्याद्वारे पाणी आणण्या ऐवजी शिम्पोरा येथून थेट पाईपलाईन द्वारे पाणी नेल्यास शंभर टक्के पाणी तलावापर्यंत पोहोचण्यास मदत होईल या विचाराने आपण थेट पाईपलाईनचाच ध्यास घेऊन या कामाबाबत पाठपुरावा केल्यानंतर 1400 कोटी रु.किमतीच्या कामाची मंजुरी मिळाली होती..मात्र महाविकास आघाडीच्या सत्तांतरानंतर हे काम रद्द करण्याचे पत्र कुणी दिले ? हे सांगण्याची गरज नाही त्यानंतर च्या कालावधीमध्ये जे सत्तेवर होते त्यांनी त्यांच्या सत्ता काळामध्ये या कामाला मंजुरी का आणली नाही ? असा अप्रत्यक्ष नाव न घेता त्यांनी निर्देश केला.. अजित दादा पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आपण या कामाबाबत पाठपुरावा केला असून वेळोवेळी पत्र व्यवहार केलेला आहे पूर्वी मंजूर झालेले काम रद्द केले नसते तर आज हे काम 50 टक्के पर्यंत झाले असते आणि आज कामाला गती मिळाली असती.. सुरुवातीला 1400 कोटी रु किमतीचे हे ज्यादा किमतीचे आहे असे सांगितले गेले..परंतु आता हे मंजूर झालेले काम देखील 1400 कोटी रु.चेच आहे हे कसे ? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.आमदार सुरेश धस यांचे खुंटेफळ साठवण तलाव निर्मितीमध्ये निश्चितपणे श्रेय आहे परंतु त्या वेळच्या अंदाजपत्रका नुसार त्यामध्ये पुरेसे पाणी येणार नव्हते या सुधारित अंदाजपत्रकात प्रमाणे थेट पाईपलाईन द्वारे 1.68 टीएमसी एवढे पूर्ण क्षमतेचे पाणी या तलावामध्ये येणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी माझ्याकडे देखील पत्र दिलेले आहे..ही योजना माझ्या एकट्याची नसून आ. सुरेश धस माजी आमदार भीमराव धोंडे आणि सध्या शरदचंद्र पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले साहेबराव दरेकर यांना देखील याचे श्रेय आहे या थेट पाईपलाईन योजने ची निविदा आणि मंजुरीनंतर या योजनेच्या शुभारंभासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या तीनही मान्यवरांच्या हस्ते या योजनेच्या शुभारंभ करून यावेळी सर्वपक्षीय नेत्यांच्या वतीने आष्टी तालुक्यातील गोरगरीब शेतकरी आणि जनतेसाठी कायमस्वरूपी प्रश्न सुटण्यासाठी पाणी मिळावे यासाठी आष्टी तालुक्याच्या हक्काचे उर्वरित 4.00 टीएमसी पाणी मिळावे यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची गरज आहे असे त्यांनी शेवटी सांगितले..
★जनतेला माहिती खुंटेफळ साठवण तलावाची प्रक्रिया
मतदार संघातील जनता अतिशय हुशार आहे त्यांना आता पहिल्यासारखं गृहीत धरण शक्य होणार नाही किंवा त्यांना चुकीची माहिती देऊन दिशाभूल करणे सुद्धा शक्य नाही कारण की जनता अति हुशार झाली आहे, त्यामुळे खुंटेफळ साठवण तलावाची प्रक्रिया कोणी केली कशी केली हे सर्व माहिती असल्याने आता कोणीही दिशाभूल करू नये आता फक्त जनतेला योग्य वेळी पाणी मिळून परिसर कसा सुजलाम सुफलाम होईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, उगाच श्रेया वादाच्या लढाईमध्ये जनतेचे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये एवढीच अपेक्षा आहे, अशा भावना आमदार बाळासाहेब आजबे यांनी व्यक्त केल्या..