आमदार बाळासाहेब आजबेंच्या वाघानी गाजवलं मैदान !
★बाळासाहेब तांबे व सुभाष घोळवे यांच्यासह सहकाऱ्यांनी गाजवलं मैदान!
पाटोदा | सचिन पवार
पाटोदा तालुक्यातील ग्रामपंचायत नुकत्याच पार पडल्या यामध्ये आमदार बाळासाहेब आजबे यांच्यावर विश्वास ठेवून नागरिकांनी ग्रामपंचायत मध्ये सुद्धा आमदार आजबे यांच्या पारड्यात मतदान करून पाटोदा तालुक्यातील सात ग्रामपंचायत जवळपास ताब्यात दिल्याने आजबे यांचे वर्चस्व वाढले आहे. जाधववाडी, भराटवाडी, गायकवाडी, घोळेवाडी ग्रुप ग्रामपंचायत वर सुद्धा आजबे यांचा झेंडा फडकला आहे यामध्ये बाळासाहेब तांबे, सुभाष घोळवे यांच्या पॅनलने एक हाती सत्ता मिळवत सरपंच पदी सुभाष मारुती घोळवे यांची वर्णी लागली आहे.
जाधववाडी, भराटवाडी, गायकवाडी, घोळेवाडी ग्रुप ग्रामपंचायत वर बाळासाहेब तांबे सुभाष घोळवे यांच्या पॅनल एक हाती सत्ता मिळवत आमदार बाळासाहेब आजबे काका यांचे हात बळकट केले आहेत. आमदार बाळासाहेब आजबे यांनी मतदारसंघाच्या विकासात भर टाकणारे काम केल्याने जनतेने सुद्धा त्यांच्या कार्यकर्त्यांना भरपूर मतदान करून ग्रामपंचायत ताब्यात दिली आहे येणाऱ्या काळात आमदार बाळासाहेब आजबे यांच्या माध्यमातून गावाचा कायापालट करण्याचा सुद्धा संकल्प जाधव वाडी ग्रुप ग्रामपंचायत च्या सर्व नवनिर्वाचित सरपंच सदस्यांनी केला आहे.
★आमदार आजबे काकांच्या माध्यमातून गावाचा विकास करू – बाळासाहेब तांबे
आष्टी मतदार संघाचे आमदार बाळासाहेब आजबे काका यांनी तर संघाच्या विकासात भर टाकणारे अनेक कामे केले आहेत तर ग्रामपंचायत मध्ये सुद्धा कोट्यावधीचा निधी देऊन गावाची गाव सुजलाम सुफलाम करण्याचा संकल्प केला आहे हेच लक्षात ठेवून जनतेने सुद्धा जाधव वाडी ग्रुप ग्रामपंचायतला भरपूर मतदान करून एक हाती सत्ता दिल्याबद्दल सर्व जनतेचे प्रथमता जाहीर आभार तसेच आमदार बाळासाहेब आजबे काकांच्या माध्यमातून गावाचा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू..
– बाळासाहेब तांबे, सुभाष घोळवे
पॅनल प्रमुख जाधववाडी, भराटवाडी, गायकवाडी, घोळेवाडी ग्रुप ग्रामपंचायत.
★यांनी गाजवलं मैदान!
ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय जाधववाडी, भराटवाडी, गायकवाडी, घोळेवाडी आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या ताब्यात घेण्यासाठी बाळासाहेब तांबे, सुभाष घोळवे, संतोषशेठ थोरवे, सुभाष दहिफळे, भाऊसाहेब घोळवे, बबन भराटे, बाळासाहेब जायभाये, योगेश जायभाये, बापूराव पालवे, अंगद शिंदे,संपत घोळवे, तुकाराम जायभाये, अशोक जायभाये, वैजनाथ थोरवे, गणेश जाधव, राम जाधव,अर्जुन जाधव, बबन आबा,बबन भराटे, रमेश वारे फौजी, सुखदेव भराटे,शरद भराटे, वैजनाथ भराटे, मधुकर दहिफळे, अतुल दहिफळे, भाऊसाहेब दहिफळे,बाळु दहिफळे, सतीष पवार, महादेव घोळवे, हाणुमंत घोळवे,दादा दहिफळे,संजय तांबे, धनंजय तांबे,विठ्ठल शिरसाट, दत्ता शिरसाठ, संतोष शिरसाठ, रमेश आजिनाथ शिंदे यांनी गाजवलं मैदान…