17.9 C
New York
Tuesday, September 2, 2025

Buy now

spot_img
spot_img

मंत्र्यांनो, नेत्यांनो जाळपोळ झाली की भेटी मग मराठा तरुण आत्महत्या करतोय भेटी कधी देणार – मुकुंद शिंदे

★सरकार आणि नेत्यांकडून मराठा समाजाचा कायमच दोष !

पाटोदा | प्रतिनिधी

महाराष्ट्रामध्ये खास करून बीड जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा तीव्र होत आहे. मराठा तरुण युवक आत्महत्या दारी आरक्षणाची मागणी करत आहे. आरक्षणाचा मुद्दा हा अति जिव्हाळ्याचा झाल्याने युवक आत्महत्याच पाऊल उचलत आहेत परंतु सरकार मात्र युवकांच्या मुद्द्याकडे लक्ष द्यायला तयार नाही तर जाणून बसून मराठ्यांकडे दुर्लक्ष करत आहेत असं दिसून येत आहे. दुसऱ्या बाजूला मात्र मराठा आंदोलनाच्या काळामध्ये झालेल्या नेत्यांच्या घरांची पाहणी मंत्री नेते करत आहेत मात्र आत्महत्या केलेल्या मराठा युवकांच्या घरी भेटेल त्यांना वेळ नाही यावरून सरकार आणि नेते मराठ्यांचा किती दोष करतात हे सिद्ध होत आहे अशी प्रतिक्रिया पाटोदा शिवसेना तालुका प्रमुख मुकुंद शिंदे यांनी दिली आहे.
मराठा युवकांच्या आत्महत्या सरकार नेत्यांना दिसणार नाहीत त्यांना फक्त स्वार्थाच्या नेत्यांची जळालेले घर बंगले दिसतात आणि त्यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांना आधार देतात आणि मराठा युवकांना जाळपोळ करण्याच्या नावाखाली अडकवण्याचा प्रयत्न करतात. येणाऱ्या काळात मराठा युवकच तुम्हाला तुमची जागा दाखवतील यात तीळ मात्र शंका नाही. मराठा आरक्षणासाठी मराठा युवक आत्महत्या करतात आणि मराठ्यांचा आंदोलन मोडण्यासाठी सरकार आणि नेत्यांकडून जाणून बुजून जाळपोळ करत दगडफेक करत उद्रेक करण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि त्यामध्ये मराठ्यांच्या युवकांना अडकवून हे आंदोलन मोडकळीस आणण्याचा प्रयत्न केला जात आहे परंतु याला सर्वसामान्य जनता जाणून आहे येणाऱ्या काळात जनता नेते मंडळीला आणि सरकारला चांगला धडा शिकवल्यातील मात्र शंका नाही अशा भावना आणि इशारा पाटोदा शिवसेना प्रमुख मुकुंद शिंदे यांनी दिला आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!