23 C
New York
Sunday, August 31, 2025

Buy now

spot_img
spot_img

आमदार काका पॅटर्न जोरदार!

पाटोदा तालुक्यावर आमदार बाळासाहेब आजबे काकांचे वर्चस्व !

★12 पैकी 7 ग्रामपंचायत वर आमदार आजबे यांची सत्ता

पाटोदा | सचिन पवार

नुकत्याच पार पडलेल्या पाटोदा तालुक्यातील बारा ग्रामपंचायतच्या निवडणुकीत धनगर जवळका एकमेव ग्रामपंचायत सरपंच पद बिनविरोध झाले तर बाकीच्या ग्रामपंचायतच्या निवडणुका रविवार दिनांक 5 नोव्हेंबर 2023 रोजी मतदान झाले. सोमवार दिनांक सहा रोजी तहसील कार्यालय पाटोदा येथे सहा टेबलवर मतमोजणी प्रक्रिया पार पडली यावेळी विजयी उमेदवार जाहीर करण्यात आले एकूण पाटोदा तालुक्यातील ग्रामपंचायतीवर सात ग्रामपंचायत आमदार बाळासाहेब आजबे यांच्या ताब्यात गेल्याने आमदार आजबे यांचे पाटोदा तालुक्यावरील वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले.
पाटोदा तालुक्यातील बारा ग्रामपंचायत पैकी सात ग्रामपंचायत आमदार बाळासाहेब आजबे रामकृष्ण बांगर यांचे तर पाच ग्रामपंचायतीवर भाजपचे सुरेश धस यांचे वर्चस्व राहिले आहे. या मतदान प्रक्रियेत गावांनी हाय सरपंच पदाचे विजयी व पराभूत उमेदवार व त्यांना झालेले मतदानाची यादी सविस्तर आपल्याला दैनिक लोकवास्तवच्या माध्यमातून वाचायला मिळत आहे. गावाच्या विकासामध्ये भर टाकण्यासाठी आमदार आजबेन कडून सर्व तोपर मदत केली जाणार असल्याचा सुद्धा बोलले जात आहे गावाच्या विकासात कसलीच बाधा येणार नाही याची काळजी सुद्धा आमदार बाळासाहेब आजबे यांच्याकडून घेतली जाणार असल्याचे सदस्य सांगितले आहे. आमदार आजबे त्यांच्यावर विश्वास ठेवून नागरिकांनी पाटोदा तालुक्याची चावीच आमदार आजबे यांच्या हातात दिली असंच म्हणावं लागेल..

★विजयी व पराभूत उमेदवार खालील प्रमाणे..

1) तांबाराजुरी – श्रीमती लक्ष्मण बाबुराव तांबे 861 मते, तांबे ज्योती दीपक 742 मते..
2) चुंबळी – पवळ रेश्मा हनुमंत 612 मते, मळेकर शोभा विकास 337 मते…
3) वहाली – अशोक अजिनाथ पवार 446 मते, सरोदे संग्राम कल्याणराव 331 मते..
4) मुगगाव – केकान स्मिता रवींद्र 783 मते, गोरे राजश्री नवनाथ 772 मते..
5) उंबरविहीर – नेमाने शिवाजी जालिंदर 512 मते..
6) जाधववाडी – घोळवे सत्यभामा मारुती 497 मते, भाकरे संजय बयाजी 416 मते..
7) मंझरी घाट – गीते सिंधू आबासाहेब 71 मते, गीते संगीता भीमराव 57 मते..
8) धनगरजवळका सौ.सुरेखा अभय पवार बिनविरोध..
9) रोहतवाडी सौ शिंदे छाया पांडुरंग 734 मते, गायकवाड मधुकर गुलाब 473 मते..
10) वाघीरा – बांगर किसन 851 मते, बांगर अशोक विश्वनाथ 845 मते..
11) वडझरी – सानप अंजली संजय 1010 मते, सानप छाया अनुराध 623 मते..
12) गांधनवाडी – जेधे अशोक यशवंत 599 मते, जगताप भागचंद्र तुळशीराम 548 मते..

★पाटोद्यातील सर्वसामान्य जनतेचा आमदार आजबेंवर विश्वास वाढला!

सर्वसामान्य जनतेची कार्यकर्त्याची निवडणूक म्हणून ग्रामपंचायत निवडणुकीकडे पाहिले जात याच निवडणुकीमध्ये सर्वसामान्य जनतेने आमदार आजबे यांच्या कार्यकर्त्यावर विश्वास टाकत विकासाची शिदोरी घेतलेले आमदार बाळासाहेब आजबे यांना आता पाटोदा तालुक्यातील गावांच्या विकासाची जबाबदारी दिली आहे. आमदार बाळासाहेब आजबे यांनी आमच्या गावाचा खुंटलेला विकास करावा अशी जनतेची अपेक्षा आहे..

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!