सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्यामुळे वाचले एकाचे प्राण
जामखेड | प्रतिनिधी
आज सोमवार दिनांक ६/११/२०२३ रोजी रात्री ९:० नऊ वाजता कर्जत रोडवरील त्रिमूर्ति मंगल कार्यालया समोर मोटर सायकला कुत्रे आडवे आल्याने गाडीवरील दत्तात्रय मोहन पवार वय ४० राहणार जामवाडी तालुका जामखेड हा जबर जखमी झाला असून डोक्याला मार लागला आहे सदरची माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना सागर वनवे आणि दीपक भोगे यांनी दिली असता संजय कोठारी हे आपली रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी पाच मिनिटात दाखल झाले जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दत्तात्रय पवार यास आपल्या रुग्णवाहिकेत आणले असता तब्येत गंभीर होती दवाखान्यात दाखल करून त्याचे प्राण वाचले आहे सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी आत्तापर्यंत हजारो लोकांचे प्राण वाचवले आहेत रात्री बे रात्री केव्हाही अपघात झाला की संजय कोठारी त्यांना फोन केला की ते ताबडतोब येऊन जखमींना वाचवण्याचे काम करतात या कामी दीपक भोगे, दीपक ढोबे ,सागर वनवे ,अजित भोगे ,समीर शेख, पवन जाधव यांनी मदत केली.
★जामखेड शहरातील रस्ता धुळीमुळे व चिखलामुळे त्रासदायक
सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी स्मिता पवार उप अभियंता राष्ट्रीय महामार्ग अहमदनगर यांना फोनवर माहिती दिली की जामखेड शहरातील रस्त्यावर धुळीचे प्रमाण जास्त झाले असून चिखलाचे मोठमोठे गट्टे झाले आहेत त्यामुळे ॲम्बुलन्स चालवणे धोक्याचे वाटते पाच दिवसांपूर्वी एक महिला प्रस्तुतीपूर्वक त्रासदायक झाली होती त्रिचय डिलीवरी होता नसल्याने तिला सरकारी दवाखान्यातून डॉक्टर खराडे यांच्या दवाखान्यापर्यंत नेई पर्यंत त्या खडखडीने तिची पाच मिनिटात डिलिव्हरी झाली तसेच अपघातातील रुग्णांना आणणे धोकेदायक वाटते तरी तुम्ही ताबडतोब ट्रॅक्टरची फळी मारून रोड व्यवस्थित करून द्यावा त्यांनी ताबडतोब करून देण्याचे मान्य केले..