आदेश पाटलांचा ; पाटोद्यात मराठ्यांचे साखळी उपोषण 11 व्या दिवशी थांबले !
★मराठा योद्धा मनोज जरांगे यांचा आदेश आल्यानंतर पुढील दिशा ठरवली जाईल
पाटोदा | सचिन पवार
पाटोदा तालुक्यामध्ये मराठा योद्धा मनोज जरांगे यांच्या आदेशानुसार सुरू असलेलं मराठा आरक्षणाच साखळी उपोषण सलग अकरा दिवस सुरू राहील यामध्ये पाटोदा तालुक्यातील शहरासहित ग्रामीण भागातील गावांनी देखील मोठा सहभाग नोंदवला यामध्ये महिला युवक शाळेतील विद्यार्थ्यांनी सुद्धा शक्य होईल त्या पद्धतीने येऊन सहभाग नोंदवला. नाऱ्या काळात मराठा योद्धा मनोज जरांगे यांच्या आदेशानुसार पुढील दिशा ठरवली जाईल अशी माहिती देखील सकल मराठा समाज बांधवांकडून देण्यात आले आहे.
मराठा आरक्षणासाठी पाटोदा तालुक्यामध्ये अकरा दिवस साखळी उपोषण करण्यात आले होते यामध्ये अकरा दिवस विविध उपक्रम घेत साखळी उपोषण सुरू ठेवले.. महिलांनी युवकांनी शाळकरी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत मराठा आरक्षणाची धग किती आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला. अकरा दिवस मराठा सेवकांनी योग्य ती काळजी घेत कोणताही अनुचित प्रकार न घडता हे उपोषण पार पाडले या आंदोलनाला धार्मिक राजकीय सामाजिक शैक्षणिक चित्रातील सर्वांनीच मोठा सहभाग नोंदवत आरक्षणाच्या चळवळीत सोबत असल्याचं दाखवून दिले आहे.
★11 दिवसाच्या सकाळी उपोषणातील उपक्रम!
महिला युवक नागरिकांच्या उपस्थितीतील साखळी उपोषण 11 दिवस चालले..
» एक दिवस सर्व नागरिकांच्या उपस्थितीमध्ये कॅण्डल मार्च काढण्यात आला.
» साखळी उपोषण आदरम्यान अकरा दिवस अखंड भजन सुरू होते.
» ह भ प सस्ते महाराज यांचे एक दिवस कीर्तन ठेवण्यात आले होते.
» पाच दिवस अन्न त्या साखळी उपोषण करण्यात आले होते.
» एक दिवस मुस्लिम बांधवांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले होते.
» गांधीगिरी करत शासन आपल्या दारी हा कार्यक्रम उधळून लावण्यात आला.
» पाटोदा तालुक्यातील पत्रकार बांधवांच्या वतीने एक दिवस आंदोलन करण्यात आले होते.
★साखळी उपोषणातील आयोजक
मराठा आरक्षणासाठी पाटोदा तालुक्यात केलेलं साखळी उपोषण 11 दिवस चालले या उपक्रमाची जबाबदारी मराठासेवक बाबा तिपटे व मराठासेवक युवराज जाधव यांनी स्वतःच्या खांद्यावर घेत पूर्ण अकरा दिवस व्यवस्थित साखळी उपोषण पार पाडले त्याला सर्व नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला.
★त्रिमूर्ती मंडप व श्री गणेश डिजिटल विशेष सहकार्य!
पाटोदा तालुक्यात प्रत्येक वेळी होणाऱ्या मराठा आरक्षणाच्या चळवळीसाठी कार्यक्रमासाठी नेहमीच त्रिमूर्ती मंडप व श्री गणेश डिजिटल यांचे विशेष सहकार्य लाभले आहे यावेळी देखील संपूर्ण अकरा दिवस मोफत मंडप ची व्यवस्था त्रिमूर्ती मंडप च्या माध्यमातून करण्यात आली होती तर श्री गणेश डिजिटल च्या माध्यमातून डिजिटल ची व्यवस्था करण्यात आली होती मराठा बांधवांकडून विशेष आभार व्यक्त केले आहे.