शिरूर कासार तालुका दुष्काळग्रस्त जाहिर करा – गोकुळ सानप
शिरूर | प्रतिनिधी
यावर्षी बीड जिल्ह्यात पाऊस अत्यंत कमी झालेला आहे काही दिवसांपूर्वी शासनाने दुष्काळग्रस्त तालुक्यांची घोषणा केलेली आहे या दुष्काळग्रस्त तालुक्यात ५० टक्के पेक्षा आनेवारी कमी आलेल्या शिरूर कासार तालुक्याचा समावेश करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गोकुळ सानप, रायमोहाकर यांनी प्रसिध्दी पञकाव्दावारे केली आहे पुढे प्रसिध्दीस दिलेल्या पञकात म्हटले आहे की शिरुर कासार तालुक्यात सरासरी पेक्षा खुप कमी पाऊस झालेला असल्यामुळे या तालुक्यात आनेवारी ५० टक्केच्या आतमध्ये आलेली आहे व सध्या कोणत्याही तलावात पुरेसा पाणीसाठा नाही त्यामुळे ऐन हिवळ्यामध्येच पाणी टंचाई व चारा टंचाईचा प्रश्न प्रश्न बिकट झालेला आहे आणखी आठ महिने कालावधी पुढील पावसाळ्याच्या दरम्यान जाणार असल्याने या कालावधीत भिषण पाणी टंचाई व जनावरांच्या चा-यांचा प्रश्न भयंकर निर्माण होत आहे त्यामुळे शिरूर कासार तालुका दुष्काळग्रस्त म्हणुन जाहिर करुन राज्य शासनाच्या दुष्काळग्रस्त तालुक्यामध्ये शिरूर कासार तालुक्याचा समावेश करण्यात यावा अशी मागणी प्रसिध्दी पञकातुन सामाजिक कार्यकर्ते गोकुळ सानप, रायमोहाकर यांनी केली आहे.