★आमदार बाळासाहेब आजबेंनी एक पाऊल विकासाकडे जाण्याची धरली वाट!
आष्टी | सचिन पवार
आष्टी मतदार संघाचे लोकप्रिय आमदार बाळासाहेब आजबे यांच्याकडून मतदार संघातील विकास कामांना गती मिळाली आहे रस्ते विहिरी तलाव इत्यादी गोष्टीवर विशेष लक्ष केंद्रित करत दळणवळणाचे मार्ग सुखकर करण्याचा त्यांचा संकल्प आहे. चिंचाळा देसुर रस्त्यावरील चिंचाळा गावालगत असलेल्या नदीवरील पुलासाठी 50 लक्ष रुपये मंजूर करून दळणवळणाचा मार्ग अधिक सुखकर करण्याचा आमदार बाळासाहेब आजबे यांचा प्रयत्न सफल झाला आहे.
आष्टी तालुक्यातील चिंचाळा देसूर हा महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग असल्याने रस्त्याचे काम देखील चांगल्या प्रकारे पूर्णत्वाकडे गेले आहेत तर अनेक ठिकाणी पुलाच्या समस्या असल्याने ग्रामस्थांच्या मागणी वरून आमदार बाळासाहेब आजबे यांनी चिंचाळा गावात असणाऱ्या नदीवरील पुलासाठी 50 लाख रुपये मंजूर करून ग्रामस्थांची मागणी पूर्ण केली आहे. आमदार बाळासाहेब आजबे यांनी हा महत्त्वाचा प्रश्न सोडवल्याबद्दल चिंचाळा गावचे सरपंच पंडित अण्णा पोकळे, सदस्य बाळासाहेब पोकळे, सदस्य ज्ञानेश्वर पोकळे, सदस्य अनिल पोकळे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी व ग्रामस्थांनी आमदार बाळासाहेब आजबे यांचे जाहीर आभार व्यक्त केले आहेत.
★आमदार आजबेंमुळे गावाच्या विकासात अधिक भर – सरपंच पंडित पोकळे
चिंचाळा गावच्या विकासामध्ये आष्टी मतदार संघाचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी अधिकच लक्ष देऊन भरपूर निधी दिला आहे त्यातून गावाच्या विकासात भर पाडण्यासाठी मदत झाली आहे त्याबद्दल सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करत आहोत..
★पंडित अण्णा पोकळे
सरपंच चिंचाळा.